दोघांचं लग्न ठरलं, पण होणाऱ्या पतीने लग्नाआधीच केली 'ती' मागणी! पत्नीने नकार दिला अन् नंतर जे काही घडलं ते...

मुंबई तक

पालघर जिल्ह्यात एका तरुणाने त्याचं लग्न होण्यापूर्वीच होणाऱ्या पत्नीकडे एक मागणी केली आणि तिने ती मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. मात्र, त्याच्या या मागणीमुळे त्याने असं काही केलं की त्याचा त्याला आयुष्यभर पश्चात्ताप होत राहिला.

ADVERTISEMENT

होणाऱ्या पतीने लग्नाआधीच केली 'ती' मागणी! नंतर जे काही घडलं ते...
होणाऱ्या पतीने लग्नाआधीच केली 'ती' मागणी! नंतर जे काही घडलं ते...(फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

होणाऱ्या पतीने लग्नाआधीच केली 'ती' मागणी!

point

पत्नीने नकार दिल्यास घडली धक्कादायक घटना

Crime News: पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणाचं लग्न ठरल्यानंतर तो पुढची स्वप्नं रंगवू लागला होता. पण, त्याने त्याचं लग्न होण्यापूर्वीच होणाऱ्या पत्नीकडे एक मागणी केली आणि तिने तिच्या होणाऱ्या पतीला ती मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. मात्र, त्याच्या या मागणीमुळे त्याने असं काही केलं की त्याचा त्याला आयुष्यभर पश्चात्ताप होत राहिला. 

खरंतर, पालघरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याच्या इच्छेपोटी आपल्या होणार्‍या पत्नीवर बलात्कार करून तिची हत्या केली. आरोपीने तरुणाने पीडितेला मारण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याचा पीडितेच्या आईने आरोप केला आहे. घरात कोणीच नसताना आरोपीने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. पीडितेच्या आईने याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता पोलिसांनी त्यानंतर काही तासांतच आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. आता पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

होणाऱ्या पतीने केली चुकीची मागणी...

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील बिबलधर गावात राहणाऱ्या एका तरुणीचं लग्न आरोपी तरुणासोबत ठरलं होतं. हे लग्न दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने होणार होतं. घटनेच्या दिवशी पीडितेचे आईवडील शेतात कामाला गेले होते. त्यावेळी ती घरी एकटीच होती. तेव्हा तरुणीचा होणारा नवरा तिथे आला आणि तिच्याकडून त्याने शारीरिक संबंधांची मागणी केली. पण तिने यासाठी स्पष्टपणे नकार दिला.

हे ही वाचा: महिलेचे हात-पाय बांधले अन्... 13 व्या मजल्यावरील लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं? सीसीटीव्ही मध्ये झालं रेकॉर्ड!

लग्नाआधीच शारीरिक संबंधाची मागणी

घरी कोणीच नसताना, आरोपी तरुण कोणालाही न सांगता पीडितेच्या घरी गेला आणि तो पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता. पीडितेने लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास आरोपी तरुण संतापला. त्यावेळी रागाच्या भरात आरोपीने पीडितेसोबत बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली. घटनेनंतर आरोपी तिथून फरार झाला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp