भारतीय जोडपं हनिमूनसाठी Switzerland गेलं, हॉटेलमध्ये घडलं भलतंच.. तरूणीचे 12 दातच लागले हलू!
मूळचे भारतीय असलेले एक जोडपं हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला गेलं होतं. पण हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत अशी घटना घडली की, ज्यामुळे तरुणीला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. जाणून घ्या नेमकी घटना काय.
ADVERTISEMENT

स्वित्झर्लंड: मूळचे भारतीय असलेलं एक जोडपं हे हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला गेले होते, प्रत्येकजण एक संस्मरणीय हनिमून साजरा करण्याचे स्वप्न पाहतो, या जोडप्याचेही तेच स्वप्न होते. हे जोडपे स्वित्झर्लंडमधील एका आलिशान हॉटेलमध्ये राहिले, पण या हॉटेलमध्ये या जोडप्यामध्ये असे काही घडले की तरूणीचे 12 दात हलायला लागले. पण या जोडप्यासोबत नेमकं काय झालं हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
खरं तर, हे भारतीय जोडपे निकिता आणि करण कॅनडामध्ये राहतात, निकिता मूळची मुंबईची आहे आणि करण कॅनेडियन नागरिक आहे. दोघेही हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला गेले होते. दोघेही स्वित्झर्लंडमधील सी हॉटेल श्वार्ट येथे राहिले. मात्र, कडक उन्हात त्यांच्या खोलीत एअर कंडिशनर किंवा पंखा नव्हता. जेव्हा जोडप्याने हॉटेलमध्ये पंखा मागितला तेव्हा त्यांना एक छोटा पंखा देण्यात आला. मात्र, त्यानंतर त्या जोडप्याने जवळच्या दुकानातून दुसरा पंखा भाड्याने घेतला. पण दुसऱ्या दिवशी हॉटेलचा पंखा त्यांना न कळवता खोलीतून काढून टाकण्यात आला.
हे ही वाचा>> हनिमून आटोपला आणि नव्या नवरीने केलं असं काही..., तुम्हीही म्हणाल मॅडम तुमचा विषय तर लई हार्ड
त्यानंतर रात्री त्या जोडप्याने रिसेप्शनवर फोन केला त्यानंतर एक कर्मचारी आला पण माफी मागण्याऐवजी त्याने त्या जोडप्याशी भांडण सुरू केले आणि त्यांना मूर्ख म्हटले. त्यानंतर हॉटेलमधून चेकआउटच्या दिवशी म्हणजेच 21 जून रोजी निकिता नाश्त्यासाठी फळं आणण्यासाठी गेली. या दरम्यान हॉटेल कर्मचाऱ्याने तिच्याशी पुन्हा भांडण सुरू केले.
1 दात तुटला आणि 11 दात हलू लागले
दरम्यान, एक हॉटेल कर्मचारी करणकडे आला आणि त्याच्या अगदी तोंडाजवळ येऊन बाचाबाची करू लागला. निकिताला वाटले की तो करणवर हल्ला करणार आहे. भीतीने निकिताने व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. यानंतर कर्मचाऱ्याने जोडप्याचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर हल्ला केला. कामगाराने निकितावर एक जड सिरेमिक मग फेकला, ज्यामुळे तिचा 1 दात तुटला आणि 11 दात हलू लागले. तिच्या जबड्याचे हाडही खिळखिळे झाले. करण म्हणाला की, जेव्हा ते मागच्या दाराने पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हाही कर्मचाऱ्याने हल्ला केला. हल्ल्यानंतर निकिताला एकटेच रुग्णालयात जावे लागले. त्यानंतर जोडप्याला त्यांचे सर्व नियोजन रद्द करावे लागले.
हे ही वाचा>> दोन मुलांची आई 8 वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत गेली OYO हॉटेलमध्ये, आता बस्स झालं म्हणाली अन्...
हॉटेल प्रशासनाचं म्हणणं काय?
तथापि, हॉटेलने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आणि जोडप्याला आक्रमक म्हटले आहे. हॉटेल मालकाने सांगितले की, निकिता आणि करण सुरुवातीपासूनच असभ्य होते. हॉटेलचा दावा आहे की, निकिताने कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीरपणे रेकॉर्डिंग केले. जेव्हा तिला रेकॉर्डिंग थांबवण्यास सांगितले गेले तेव्हा तिने कर्मचाऱ्यावर हल्ला केला. हॉटेलच्या म्हणण्यानुसार, 60 वर्षीय कर्मचाऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली आणि रक्तस्त्रावही झाला.