बीड हादरलं! चिमुरडीचा गळफास घेतलेला मृतदेह झाडाला आढळला, त्याच ठिकाणी वडिलांचाही मृतदेह... हादरून टाकणारं प्रकरण
Beed Crime : तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा एका झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ उडाली, नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बीड हादरलं!

तीन वर्षांच्या चिमुकलीचा झाडाला मृतदेह आढळला

नेमकं काय घडलं?
Beed Crime : बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीनं डोकं वर काढलं असता, बीडमध्ये आता काही लोकांच्या आत्महत्येतही वाढ होऊ लागली आहे. एका तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ उडाली. बीडच्या इमामपूर रोड परिसरातील या तीन वर्षीय मुलीचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या परिस्थितीत दिसून आला. याआधी याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मुलीचाही मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
हे ही वाचा : 6 वर्षाच्या मुलीला 5 रुपयांचे आमिष दाखवून दोघांनी निर्जनस्थळावरील खोलीत नेलं, नंतर लैंगिक शोषण करत पीडितेला रक्तस्त्राव...
गळफास घेत आत्महत्या की खून?
दोन दिवसांपूर्वी मुलीचे वडील जयराम बोराडे या व्यक्तीने इमामपूर परिसरात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतरच बोराडे यांनी आपली तीन वर्षांची मुलगी बेपत्त असल्याचं सांगितलं होतं. त्याच मुलीचा गेली दोन दिवसांपासून शोध सुरू होता. सकाळी याच परिसरात एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमागे नेमकं कोण आहे? असा प्रश्न उपस्थित झाला असून याची माहिती अदयापही समोर आली नाही. संबंधित प्रकरणात ग्रामीण पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत दिसून आल्याने पोलिसही पेचात पडलेत.
मुलीला गळफास देऊन मारण्यात आलं?
संबंधित प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत. नेमकी ही आत्महत्या आहे की चिमुरडीला गळफास देऊन मारण्यात आलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित प्रकरण लवकरच पोलीस प्रशासन उघडकीस आणेल. दोन दिवसांपूर्वी वडिलही अशाच अवस्थेत एका झाडाला लटकलेल्या परिस्थितीत दिसून आले. त्यानंतर ही चिमुरडीही तशाच स्थितीत झाडाला लटकलेली दिसून आली.
हे ही वाचा : मूल होत नाही म्हणून महिला मांत्रिकाकडे गेली, नंतर पेढा देत अंगारही लावला, तीन लाखांना गंडा घालत... नऊ महिने सुरू होता खेळ
बीडमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या रामगड परिसरातील तरुणांनी एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीला गळफास घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. तेव्हा बीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.