Government Jobs : भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) ने प्रोजेक्ट इंजिनिअर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स (10 पदे), मेकॅनिकल (5 पदे) आणि कॉम्प्युटर सायन्स (5 पदे) या शाखांमध्ये एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर असून सुरुवातीला 1 वर्षासाठी हा कार्यकाळ असेल, जो आवश्यकतेनुसार कमाल 4 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. पात्र उमेदवारांसाठी 6 आणि 7 जून 2026 रोजी थेट 'वॉक-इन इंटरव्यू' आयोजित करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित शाखेतील प्रथम श्रेणीतील (First Class) बी.ई. किंवा बी.टेक. (BE/B.Tech) पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच, पदवी पूर्ण झाल्यानंतरचा किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव अनिवार्य आहे. वयोमर्यादेचा विचार केला तर, 7 मे 2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे; हे वय प्रामुख्याने अनारक्षित (UR) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) लागू असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.
हे ही वाचा : एशियन गेम्ससाठी निवड झाली अन् सगळंच संपलं! क्रीडा विश्वावर शोककळा
किती मिळणार वेतन?
निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी दरमहा 30,000 रुपये मानधन दिले जाईल, जे कामाच्या अनुभवानुसार आणि कार्यकाळ वाढल्यास चौथ्या वर्षापर्यंत दरमहा 39,000 रुपयांपर्यंत वाढवले जाईल. या भरतीसाठी कोणतीही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नसून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 6 आणि 7 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. दुपारी 2 नंतर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही.
हे ही वाचा : चंद्रपूर : 'आईच्या प्रियकराने माझ्यावर..' 15 वर्षीय मुलीने सगळंच सांगितलं, काय घडलं?
'इथे' होणार मुलाखत
ही मुलाखत 'द एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (AeSI), सुरंजन दास रोड, न्यू टिप्पसेंद्रा, बेंगलोर-560075' या पत्त्यावर पार पडणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आपले सर्व शैक्षणिक आणि अनुभवाची कागदपत्रं, त्यांची छायांकित प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्रे सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. या भरती संदर्भातील अधिक सविस्तर माहितीसाठी आणि अर्जाच्या नमुन्यासाठी उमेदवारांनी 'bdl-india.in' या भारत डायनामायटिक्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
ADVERTISEMENT











