CBSE 12th Topper Marksheet: वडील बॉर्डरवर शत्रूसमोर.. पोराचा 12 वीच्या परीक्षेत जबरदस्त कारनामा!

CBSE 12th Result 2025 : सीमेवर लढणाऱ्या बीएसएफ जवानाच्या लेकाचा सीबीएसईमध्ये डंका वाजवला आहे. करण पिलनियाचे वडील हे जम्मू काश्मीर बॉर्डरवर बीएसएफ सैन्यात कार्यरत आहेत.

CBSE 12th Result 2025 Karan Pilania

CBSE 12th Result 2025 Karan Pilania

मुंबई तक

• 07:31 PM • 13 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षा निकाल 2025 घोषणा करण्यात आली.

point

बीएसएफ जवानाच्या मुलाने या परीक्षेत 500 पैकी 499 वा नंबंर मिळवला आहे.

CBSE 12th Topper Marksheet : सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षा निकाल 2025 घोषणा करण्यात आली. देशभरात 13 मे या दिवशी ऑनलाईन स्वरुपात निकाल जारी करण्यात आला आहे. राजस्थानच्या खुशी शेखावतने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर आता बीएसएफ जवानाच्या मुलाने या परीक्षेत 500 पैकी 499 मार्क मिळवले आहेत. हे यश केवळ त्याचेच नसून त्याच्यामागे कुटुंबाचेही मोठे कष्ट. यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव करण पिलनिया असे आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पुन्हा लातूर पॅटर्नचा डंका! राज्यात 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के, त्यातले 113 जण एकट्या लातूरचे

करणचा निकाल पाहिल्यानंतर त्याच्या यशाचे लोक कौतुक करत आहेत. त्याचा निकाल पाहिल्यानंतर त्याला एक विषय वगळता इतर विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. त्याची यादी खाली दिली आहे. करणला किती मार्क? 

इंग्रजीत100 पैकी100 
फिजिक्समध्ये त्याला 100 पैकी100 
केमिस्ट्रीत 99 पैकी 100
इंग्रजीत 100 पैकी 100
गणित विषयात त्याला 100 पैकी 100
तर चित्रकलेत 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. एकूण 500 पैकी 499 मार्क मिळवले आहेत. 

युपी तकसोबत बोलत असताना, त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, मी परीक्षेपुरताच मर्यादीच अभ्यास केला नाही. तर पूर्ण एक वर्ष परीक्षेची तयारी केली होती. मला दहावीमध्ये अपेक्षेहून कमी मार्क्स होते. पण मी याची दखल ही बारावीमध्ये घेतली आणि चांगले गुण मिळवले. 

दरम्यान, करण पिलनियाचे वडील हे जम्मू काश्मीर बॉर्डरवर बीएसएफ सैन्यात कार्यरत आहेत. करणच्या वडिलांनी आपल्या मुलावर कधी कोणताही दबाव आणला नाही. त्याने अनेकदा चांगला अभ्यास कर असंच सांगितलं. त्यांनी अनेकदा शिक्षणाबाबत प्रेरणा दिली आहे. 

हेही वाचा : 'आम्ही घरात घुसून मारू, जिवंत सोडणार नाहीत...', PM मोदींच्या 'या' विधानाचा अर्थ काय?

करणचं पुढील ध्येय हे JEE Advanced परीक्षा असणार आहे. ही परीक्षा येत्या 18 मे दिवशी होणार आहे. त्याला देशातील चांगल्या विद्यालयातून इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्यानंतर येणाऱ्या भविष्यात देशाची सेवा करायची आहे. त्यासाठी त्याला संरक्षण संघटनेत इंजिनियरिंग शिक्षण घ्याचं आहे. 

  

    follow whatsapp