Farmer Son Got 100 Percent In SSC : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल मंगळवारी 13 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. राज्यात दहावीचा एकूण निकाल 94.10 टक्के इतका लागला. तसच राज्यात CBSE बोर्डाचा निकाल 96.60 टक्के लागला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचं समोर आलं. परंतु, संपूण महाराष्ट्रात चर्चा रंगली ती म्हणजे धारशिव येथील शेतकऱ्याच्या पोरांची..शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या विद्यार्थ्यींनी शेतीचं काम सांभाळून आणि अर्थिक अडचणींचा सामना करत यशाचं उंच शिखर गाठलं. दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळून इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या विद्यार्थ्यांनी मुंबई तकला मोठी प्रतिक्रिया दिलीय.
ADVERTISEMENT
100 टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी मुंबई तकशी बोलताना काय म्हणाले?
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर शालेय शिक्षणात ऐतिहासिक यश मिळवले आहे. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील या दोन विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवत यशाचं उंच शिखर गाठलं आहे. पृथ्वीराज पाटील आणि चैतन्य पवार यांना दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले आहेत.
हे ही वाचा >> पाकिस्तानमध्ये भूकंप भारताच्या हल्लामुळे होतोय?, ही आहे किराणा हिल्सची सगळी Inside स्टोरी!
मुंबई तकशी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाला, "माझ्या वडिलांचे शिक्षण झाले होते, पण परिस्थितीमुळे त्यांना ते अर्धवट सोडावे लागले. त्यांनी नेहमी मला एकच सांगितले, 'तू शिक्षण घे, तू आमच्या स्वप्नांची पूर्तता कर.' त्यांच्याच प्रेरणेतून मी हे यश संपादन करू शकलो. अभ्यास वेळच्या वेळी केला. रोज अभ्यासाला 4 तास दिले. शाळेत ज्या काही कॉन्सेप्ट शिकवल्या, त्या लगेचच क्लिअर करून घेतल्या. ज्या काही शंका होत्या, त्या शिक्षकांनी विचारून क्लिअर केल्या. दररोजचा अभ्यास दररोज केला. त्यामुळे जास्त ताण आला नाही. शेवटच्या दोन महिन्यात अभ्यासाची वेळ वाढवली. दिवसाता सहा तास अभ्यास केला. त्यामुळे पेपरमध्ये लोड आला नाही.
हे ही वाचा >> अमरावतीचा जन्म, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते थेट CJI... न्या. भूषण गवई यांची संपूर्ण कारकीर्द
समाजातील गरिब घटकांना आरोग्य सुविधा सहज मिळाव्यात यासाठी मी डॉक्टर होऊन सेवा करणार आहे, असं चैतन्य पवार याने प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. मी दररोज दोन तास मन लावून अभ्यास करत होतो. आण दररोज दोन तास अभ्यासाशिवाय कोणतंही काम नाही करायचं. मग आपल्याला यश मिळून जातं, असंही चैतन्य म्हणाला. "शेतकरी म्हटलं की आर्थिक अडचणी येतात. पीक चांगलं आलं नाही की संकट येतं. वेगवेगळ्या समस्या असतात. सर्व शेतकऱ्यांना अडचणी असतातच. माझ्या वडिलांनी आम्हाला असं काही जाणवू दिलं नाही. तरी आम्हालाही थोड्या आर्थिक समस्या होत्या", असंही या विद्यार्थ्याने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
