पाकिस्तानमध्ये भूकंप भारताच्या हल्लामुळे होतोय?, ही आहे किराणा हिल्सची सगळी Inside स्टोरी!

निलेश झालटे

पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा असलेल्या किराणा हिल्स येथे भारताने क्षेपणास्त्राने हल्ला केल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जात आहे. या सगळ्याची इनसाइड स्टोरी आपण जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

किराणा हिल्सची Inside स्टोरी!
किराणा हिल्सची Inside स्टोरी!
social share
google news

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्सवर हल्ला केल्याचा दावा सोशल मीडियावर सातत्याने केला जात आहे. याचं सत्य काय आहे हे आपण जाणून घेऊया शिवाय किराणा हिल्स नेमकं काय आहे. पाकिस्तानच्या न्यूक्लिअर स्टोरेज सेंटरवर भारतानं हल्ला केलाय का, सरगोदामधील अण्वस्त्र साठ्यांवर भारतानं हल्ला केलाय का, पाकिस्तानात भूकंप येण्याची कारणं यामागेच आहेत का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.

पाकिस्तानने भारताच्या वेगवेगळ्या शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने त्यापेक्षा दुप्पट मोठा हल्ला पाकिस्तानवर चढवला. भारताने 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री पाकिस्तानातील वेगवेगळ्या एअर बेसेसना लक्ष्य केलं. पाकिस्तानी एअर फोर्सचे आठ ते नऊ एअर बेस भारताने उडवून दिले. अगदी सरगोदापर्यंत हा एअर स्ट्राइक केला गेला. भारताने किराणा हिल्सवर हल्ला केल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली याचं कारण व्हायरल झालेला व्हिडीओ.  

DGMO च्या पत्रकार परिषदेत त्या संबंधी एका पत्रकाराने एअर मार्शल एके भारती यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी खूप गमतीतंच उत्तर दिलं.  भारती म्हणाले, “थँक्यू ही माहिती दिल्याबद्दल. किराणा हिल्स येथे पाकिस्तानाच अणवस्त्र साठ्याच तळ आहे, हे आम्हाला माहीत नव्हतं. पण आम्ही अशा कुठल्या ठिकाणी हल्ला केलेला नाही” 
 
सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक दाव्यांमध्ये पाकिस्तानकडून असा आरोप आहे की, भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानच्या सरगोदा येथील पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यांवर हल्ला केला. सरगोदा येथील मुशफ एअरबेस भारताच्या क्षेपणास्त्र लक्ष्यांपैकी एक असल्याचे बोललं जाऊ लागलेलं. मात्र  एअर मार्शल ए.के. भारती यांनी किराणा हिल्सवरील हल्ला केल्याच्या वृत्तांचे खंडन केलं.

हे ही वाचा>> जिथं पाकिस्ताननं हल्ला केल्याचा दावा केला, तिथंच PM मोदी पोहोचले... जवानांसोबत काय घोषणा दिल्या?

मुशफ एअरबेस आणि सरगोधा ही दोन्ही ठिकाणे एकमेकांपासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहेत, सोशल मीडियावरील या व्हिडिओंमध्ये दातेरी पर्वत शिखरांच्या पायथ्यापासून धुराचे दाट लोट उठताना दिसत आहेत. हायरिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा नसल्यामुळे किराणा येथील अण्वस्त्र साठा जर असेल तर त्याचा खात्मा केला आहे की नाही याची पुष्टी करणे कठीण आहे. सोशल मीडियावरील व्हायरल फुटेजमध्ये आजूबाजूच्या शिखरांवरून धूर येत असल्याचे दिसून येत आहेत.

इंडिया टुडेच्या ओपन-सोर्स इंटेलिजेंस टीमकडून यासंदर्भात रिसर्च केला गेला. जियो लोकेशनच्या आधारावरुन धुराचं हे ठिकाण आसपासच्या शिखरांजवळ जात असल्याचं दिसतंय. मात्र एअर मार्शल भारती यांनी किराणा हिल्सवर अणुसंपत्तीच्या अस्तित्वाबाबतची माहिती देखील नाकारली आहे. 

किराणा हिल्स कसं आणि केव्हा ओळखलं गेलं? हे आता जाणून घेऊयात...

2023 च्या अहवालात किराणा हिल्स आणि जवळपासच्या भागांना "सबक्रिटिकल न्यूक्लियर टेस्ट साइट" म्हणून ओळखले  होते, जे बुलेटिन ऑफ द अॅकटोमिक सायंटिस्ट्स नावाच्या एका एनजीओनं पब्लिश केलं होतं. या अहवालात म्हटले आहे की या ठिकाणी युद्धसामग्री साठवण, TEL अर्थात (ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचर) गॅरेज आणि किमान दहा भूमिगत साठवण सुविधा आहेत. हे निष्कर्ष न्यूक्लियर नोटबुकचा भाग होते.

जागतिक सुरक्षेवरील आंतरराष्ट्रीय थिंक टँक असलेल्या फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्सच्या शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या न्यूक्लियर नोटबुकचा भाग होते. शास्त्रज्ञांनी बुलेटिनसाठी लिहिलंय की सोशल मीडिया फुटेजच्या भौगोलिक स्थानावरून असे दिसून येते की, धुराचा स्रोत अहवालात नमूद केलेल्या मिसाइल ट्रांसपोर्ट वीकल स्टोरपासून एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असू शकतो. प्रभावित क्षेत्र एका टेकडीवर असलेल्या रडारपासून सुमारे 550 मीटर अंतरावर आहे. व्हिडिओचे भौगोलिक स्थान, विशेषतः डोंगराच्या रचनेवर आधारित, गुगल अर्थवर दिसणाऱ्या क्षेत्राशी बऱ्यापैकी जुळत असल्याचं दिसतंय. फुटेजमध्ये दिसणारी जवळची मशिदी उच्च-रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमांशी तुलना केल्यास स्थानाची पुष्टी करते.

सरगोदामध्ये नक्की काय आहे?

सरगोदा गॅरिसन हे किराणा टेकड्यांच्या आजूबाजूला वसलेलं  एक मोठे कॅम्पस आहे, ज्याचा वापर पाकिस्तानने 1983 ते 1990 दरम्यान त्यांच्या न्यूक्लियर प्रोग्राम चालवण्यासाठी केला होता असे म्हटले जाते. इथे पारंपारिक दारूगोळा साठवण क्षेत्र, दहा विखुरलेले संभाव्य TEL गॅरेज दिसतात, तसेच देखभालीसाठी दोन अतिरिक्त गॅरेज देखील दिसून येतात. वरिष्ठ संशोधक मॅट कोर्डा यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे की देशभरातील इतर TEL सुविधांच्या विपरीत, या TEL क्षेत्रात मानक लेआउट आणि परिमिती नाही.

हे ही वाचा>> पाकिस्तानच्या पुन्हा कुरापती? जम्मू काश्मीरमधील सांबामध्ये दिसले संशयास्पद ड्रोन, आर्मीने काय म्हटलं?

पारंपारिक दारूगोळा जागेच्या पूर्वेला डोंगराच्या उतारावर बांधलेली एक भूमिगत साठवण सुविधा आहे. हान्स एम. क्रिस्टेनसन आणि त्यांच्या टीमने अहवाल दिला आहे की "commercial satellite imagery च्या माध्यमातून किमान 10 भूमिगत सुविधांचा एंन्ट्रंस इथे दिसतो. तसेच शस्त्रे आणि क्षेपणास्त्र हाताळणीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा दिसून येतात." हल्ल्यानंतर किराणा संकुलाच्या उपग्रह प्रतिमा उपलब्ध नव्हत्या, ज्यामुळे पुढील विश्लेषण करणं अवघड झालं.  

सरगोदा व्यतिरिक्त, मिराज III आणि मिराज V लढाऊ विमाने तैनात करणाऱ्या पाकिस्तानी हवाई तळांवरही हल्ले करण्यात आले, जे अण्वस्त्र वितरणाची भूमिका बजावण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये  मसरूर आणि शोरकोट जवळ रफीकी या दोन प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.. 

आणखी एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे मुशाफ विमानतळाच्या धावपट्टीला झालेल्या नुकसानीची.  तर मसरूरबद्दल अधिकृत पुष्टी नसली तरी, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी रफीकी विमानतळावर भारताने हल्ला केल्याची पुष्टी केली होती. या ठिकाणच्या एका  कमी-रिझोल्यूशनच्या उपग्रह प्रतिमेत एक खड्डा दिसून येतोय. 10 मे रोजी झालेल्या हल्ल्यानंतर मुशाफ एअरबेसच्या धावपट्टीला झालेल्या नुकसान झालं असल्याबाबत सैटेलाइट इमेजरी और ऑफिशियल सूत्रांनी पुष्टी केली आहे.  

हा तळ लाहोरपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे F-16A/B लढाऊ विमाने तैनात आहेत. या विमानांची मारा क्षमता 1600 किलोमीटर आहे आणि ते सेंटरलाइन पायलनवरुन अणुबॉम्ब वाहून नेण्यास देखील सक्षम आहेत. अमेरिकेशी असलेल्या वचनबद्धतेचा भाग म्हणून पाकिस्तान या विमानांच्या अण्वस्त्रे वाहून नेण्याच्या क्षमतेचं संशोधन करणार नाही, असं बोललं जातं. 

सोबतच जेकबाबादजवळील शाहबाज हवाई तळावर नवीन F-16C/D विमाने तैनात आहेत, ज्यामध्ये अनेक शस्त्रास्त्रे असलेले बंकर समाविष्ट आहेत. हाय-रिजॉल्यूशन सॅटेलाइट इमेजरी असं दाखवतात की इथे मुख्य अॅशप्रनवर असलेल्या हँगरवर अचूकपणे हल्ला करण्यात आला होता, ज्यामुळे तिथल्या हवाई वाहतूक नियंत्रण इमारतीलाही अंशतः नुकसान झाले असावे, असा अंदाज आहे. 

दरम्यान, किराणा हिल्सवरील भारताकडून हल्ल्याचे व्हिडीओ जोरात व्हायरल होत आहेत. मात्र याला भारतीय सैन्याकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळं याबाबतची वास्तविकता सांगण्याचा हा प्रयत्न होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp