निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, 12 राज्यांमध्ये सुरू होणार SIR चा दुसरा टप्पा.. महाराष्ट्राबाबत काय ठरलं?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा १२ राज्यांमध्ये सुरू होत आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत देशव्यापी SIR ची घोषणा केली. बैठकीदरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षणाचा (Special Intensive Revision)दुसरा टप्पा 12 राज्यांमध्ये सुरू होत आहे. या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत करणे, नवीन मतदार जोडणे आणि चुका दुरुस्त करणे यांचा समावेश असेल.
दिल्ली येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, "आज आम्ही विशेष सघन पुनरीक्षण (SIR) च्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीची घोषणा करण्यासाठी आलो आहोत. मी बिहारच्या मतदारांना शुभेच्छा देतो आणि या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी झालेल्या आणि ती यशस्वी करणाऱ्या 75 कोटी मतदारांना सलाम करतो."
हे ही वाचा>> राज ठाकरेंकडून पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', पीएम मोदी अन् शिंदेंच्या आमदारांचे व्हिडीओ दाखवले, निवडणूक आयोगाला घेरलं
त्यांनी पुढे सांगितले की, आयोगाने सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि प्रक्रियेवर सविस्तर चर्चा केली.
आतापर्यंत आठ वेळा SIR
1951 ते 2004 दरम्यान देशात 8 वेळा विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, राजकीय पक्षांनी मतदार याद्यांच्या गुणवत्तेचा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला आहे.










