मंत्री असताना &@& मारत होता काय? प्रकाश आंबेडकरांची बच्चू कडूंवर घणाघाती टीका
Bachhu Kadu on Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रहारच्या बच्चू कडूंवर घणाघाती टीका केलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मंत्री असताना &@& मारत होता काय?
प्रकाश आंबेडकरांची बच्चू कडूंवर घणाघाती टीका
Bachhu Kadu on Prakash Ambedkar, Mumbai : "छातीवर गोळ्या झेलायला तयार आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय मागे हटणार नाही", असा इशारा प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी दिला होता. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलंय. मी अशा वल्गना फार पाहिल्या आहेत. लोकांनी यांना फसू नये. मंत्रिपद होतं तेव्हा काय @@& मारत होता? असा सवाल यावेळी आंबेडकरांनी केलाय. प्रहार संघटनेच्या वतीने बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कर्जमुक्तीसाठी काढण्यात आलेला ‘महा एल्गार’ मोर्चा आज (दि.28) मंगळवारी दुपारी साधारण 3 वाजता सुमारास नागपुरात दाखल होणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या जामठा परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त आंदोलनस्थळी तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा : नागपुरात रक्षक पुन्हा बनले भक्षक, पोलिसाकडून 23 वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ, पीडितेचे सनसनाटी आरोप
गाड्या फोडायच्या असतील तर सत्तेतील नेत्यांच्या फोडा - प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या मागण्यांसाठी तो अशा राजकीय पक्षांवर अवलंबून आहे, ज्यांनी शेतकऱ्यांचे वाटोळं केलं आहे. माझं शेतकऱ्यांना आवाहन आहे, सगळ्या शेतकऱ्यांना माझा आवाहन आहे की, कलेक्टर तुम्हाला मदत करू शकतो का ? तर माझं म्हणणं नाही. पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकत नाही, दुखणं कुठे आणि औषध तिसरीकडे ते दुखणं कसं बरं होईल. ज्याला तुम्ही सत्तेवर बसवले तुम्हाला मदत द्यायची का नाही द्यायची हे सत्तेवर बसलेल्यांनी ठरवल्याशिवाय अधिकारी कुठून मदत देणार. गाड्या फोडायच्या असतील तर सत्तेतील पक्ष भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सत्तेतील आमदार, खासदारांच्या गाड्या फोड्या! तर तुम्हाला न्याय मिळेल.
बच्चू कडू हे कर्जमाफीच्या मागणीसाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये मोठ्या मोर्चाची तयारी देखील केली आहे. त्यांनी यापूर्वी सरकारला कर्जमाफीबाबत अल्टिमेटम देखील दिला होता. दरम्यान, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निर्णय न झाल्यास रामगिरी बंगल्यावर मोर्चा धडकणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता त्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे.










