उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजपवाले भुरटे चोर', आता खासदार उदयनराजे भोसलेंचं प्रत्युत्तर

इम्तियाज मुजावर

Udayanraje Bhosale on Uddhav Thackeray, Satara : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाजपवरील टीकेला खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्युतत्तर दिलंय.

ADVERTISEMENT

_Udayanraje Bhosale on Uddhav Thackeray
_Udayanraje Bhosale on Uddhav Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजपवाले भुरटे चोर',

point

खासदार उदयनराजे भोसलेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Udayanraje Bhosale on Uddhav Thackeray, Satara : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि.28) वरळी येथील एन.एस.सी.आय डोम येथे पदाधिकाऱ्यांच्या निर्धार मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली. "आत्मनिर्भर भारत करणारे अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत, लोकं चोरावी लागतात, पक्ष फोडावे लागतात, चोरावे लागतात, नेते फोडावे लागतात, मतं चोरावी लागतात हे कसले आत्मनिर्भर ?", असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय भाजपवाले भुरटे चोर असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

बोलायचं असेल तर पुराव्यासह बोलावं, उदयनराजेंचं प्रत्युत्तर 

उदयनराजे भोसले म्हणाले, ते त्यांचं मत असेल..पण जर लोकांचंही तसंच मत असतं तर लोकांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेत बसवलं नसतं. प्रत्येकाने विचार केला पाहिजे. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो, तेव्हा तीन बोटं आपल्याकडेच वळलेली असतात. बोलायचं असेल तर पुराव्यासह बोलावं; एखाद्याचा हात पकडू शकत नाही, तसंच कोणाचं बोलणं थांबवू शकत नाही. भाजपवर आरोप करण्यापूर्वी स्वतःकडे पाहावं, असा सल्लाही उदयनराजे भोसलेंनी दिला.

हेही वाचा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा'वर महिलेचा तुफान डान्स, कार्यकर्त्यांना सुनेत्रा पवारांचा फोन

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर उदयनराजेंची प्रतिक्रिया 

फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावरून भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर विरोधकांकडून आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे म्हणाले,  कोण काय बोललं हे मला माहित नाही, पण आरोप करणं हे फार सोपं असतं. मात्र सगळं सखोल चौकशी होऊन सत्य उघडकीस येईपर्यंत निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. तपास यंत्रणेला आपलं काम करू द्या. आम्हीही गप्प बसलेलो नाही. निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचं काम मी करेन.

हे वाचलं का?

    follow whatsapp