प्रियकराच्या प्रेमात जीव झाला वेडापीसा, पोरा-बाळांना सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, नवऱ्याने विष पिलं अन्...
Crime News : प्रियकराच्या प्रेमात जीव झाला वेडापीसा, पोरा-बाळांना सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, नवऱ्याने विष पिलं अन्...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रियकराच्या प्रेमात जीव झाला वेडापीसा
पोरा-बाळांना सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली
नवऱ्याने विष पिऊन आयुष्य संपवलं
Crime News : उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका वकिलाची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा पतीला धक्का बसला आणि त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. एवढंच नव्हे तर पतीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठीही लिहून ठेवली आहे, ज्यात त्याने नमूद केले आहे की “माझ्या मुलांना माझ्या पत्नीच्या ताब्यात देऊ नका.” पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे.
ही घटना बरेलीतील कॅन्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. बरेलीतील एका वकिलाचा विवाह सुमारे आठ वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन लहान मुलं आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्या वकिलाच्या पत्नीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. नातेवाईकांनी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकण्यास तयार नव्हती. काही दिवसांपूर्वी ती अचानक घरातून बेपत्ता झाली. सुरुवातीला कुटुंबीयांना वाटले की ती माहेरी गेली असेल, पण तेथेही ती न मिळाल्याने पतीने शोध सुरू केला. अखेर समजले की ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. हे समजताच वकिलाचं मानसिक संतुलन बिघडलं.
"माझ्या मुलांना तिच्याकडे देऊ नका", वकिलाने लिहिली सुसाईड नोट
पत्नी पळून गेल्यानंतर वकील प्रचंड नैराश्यात गेला. त्याने घरातच विष घेतलं. नातेवाईकांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान डॉक्टरांना त्याच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली. त्यात लिहिलं होतं “आता मी जगू शकत नाही. जिच्या कारणामुळे मला आणि माझ्या मुलांना फसवणूक सहन करावी लागली, तिला माझ्या मुलांच्या जवळ जाऊ देऊ नका.” ही चिठ्ठी वाचून कुटुंबातील लोक आक्रोश करून रडू लागले. पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.










