"सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या जावयाने शिक्षकाच्या नावावर कर्ज काढलं, नंतर भरण्यास नकार दिला; शिक्षकाने विष घेतलं"

मुंबई तक

Rohit Pawar on Babasaheb Patil son in law : "सहकार मंत्र्यांच्या जावयाने शिक्षकाच्या नावावर कर्ज काढलं, नंतर भरण्यास नकार; शिक्षकावर आत्महत्या करण्याची वेळ", रोहित पवारांचे सनसनाटी आरोप

ADVERTISEMENT

Rohit Pawar
Rohit Pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"सरकारमधील मंत्र्यांच्या जावयाने शिक्षकाच्या नावावर कर्ज काढलं, नंतर भरण्यास नकार"

point

"शिक्षकावर आत्महत्या करण्याची वेळ"

point

रोहित पवारांचे सहकारमंत्र्यांच्या जावयावर सनसनाटी आरोप

Rohit Pawar on Balasaheb Patil, मुंबई : "राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे जावई अशोक जाधव यांनी शिक्षकाच्या नावावर कर्ज काढलं. त्यानंतर ते कर्ज भरण्यास नकार दिलाय. त्यामुळे शिक्षकावर आत्महत्या करण्याची वेळ आलीये. संबंधित शिक्षकाने विष घेतलंय", असा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. यावेळी त्यांनी संबंधित शिक्षकाचा रुग्णालयात उपचार सुरु असलेला व्हिडीओ देखील शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये पीडित शिक्षकाची मुलगी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगत आहे. 

शिक्षकाची मुलगी काय म्हणाली? 

व्हिडीओमध्ये संबंधित शिक्षकाची मुलगी पल्लवी तांदळे म्हणाली, "मी पल्लवी तांदळे आहे. उपचार घेत असलेले माझे वडिल रमाकांत तांदळे आहेत. माझ्या वडिलांनी 1986 ते 2020 या कालावधीत शाहू प्रसारक मंडळ, चाकूर यांच्या श्री संत सदगुरु विद्यालय, उजना या शाळेत 20 वर्ष नोकरी केली. नोकरी करत असताना आमदारा बाबासाहेब पाटलांनी निवडणुकीचे काम माझ्या वडिलांना सांगितले. सभा घेणे, सभा चालवणे. बाबासाहेब पाटलांच्या मुलीच्या लग्नात जेवण वाढण्यापासून त्यांनी कामं करुन घेतले. दबाव टाकून कामे करुन घेतले. माझ्या वडिलांनी त्यांना कधीच विरोध केला नाही. माझे वडिल निवृत्त होण्याच्या काही वर्ष आधी बाबासाहेब पाटलांचे भाच्चे जावई अशोक जाधव यांनी माझ्या वडिलांच्या नावावर कर्ज घेतलं. लगेच भरतो म्हणून सांगितलं. मात्र, अजूनही ते कर्ज फेडत नाहीत. याबाबत आम्ही बाबासाहेब पाटलांकडे हजार चकरा मारल्या. ते आम्हाला एनओसी देत नाहीत. अशोक जाधव माझ्या वडिलांना मरुन जा, अशी धमकी कोर्टाच्या केसमध्ये देतोय. तुमचे पैसे परत देतो म्हणून अशोक जाधवांनी आम्हाला चेक दिले होते. त्यांनी पैसे परत केले नाहीत. आम्हाला खोटे चेक दिले. बाऊंन्स झालेल्या चेकची केस देखील अजून सुरु आहे. आम्हाला लोकल मीडिया सपोर्ट करत नाहीत. पोलीस आमची केस घेत नाहीत. मी गेल्या 8 दिवसांत बाबासाहेब पाटलांना अनेकदा कॉल केलाय. ते फक्त बघतोय म्हणतात. माझ्या वडिलांनी विष पिलंय. आत्महत्येचा प्रयत्न केलाय. माझ्या वडिलांना काही झालं तर अशोक जाधव, बाबासाहेब पाटील आणि मुख्याध्यापक हनीफ सय्यद जबाबदार असतील", असंही पल्लवी तांदळे हिने स्पष्ट केलंय. 

हेही वाचा : मोठी बातमी: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण; आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण...

या प्रकरणी बोलताना रोहित पवार म्हणाले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या जावयाने रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिल्याने आता निवृत्त झालेल्या या शिक्षकावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आली… हे शिक्षक आज मृत्यूशी झुंज देत असतानाही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसतील तर हे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या ब्रीदवाक्याला साजेसं आहे का? नसेल दखल घ्यायची तर राज्याची पोलीस यंत्रणा केवळ सरकारमधील नेत्यांच्या वसुलीच्या कामासाठी आणि विरोधकांना त्रास देण्यासाठीच वापरली जाणार असं तरी एकदा सरकारने जाहीर करावं… माझी पोलिसांना विनंती आहे की, या प्रकरणाची शहानिशा करुन योग्य कारवाई करावी.

हे वाचलं का?

    follow whatsapp