'अबकी बार मोदी सरकार', घोषणेचे निर्माते पियुष पांडे यांचं निधन, जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस हरपला

मुंबई तक

Piyush Pandey passes away : 'अबकी बार मोदी सरकार', घोषणेचे निर्माते पियुष पांडे यांचं निधन, जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस हरपला

ADVERTISEMENT

Piyush Pandey passes away
Piyush Pandey passes away
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'अबकी बार मोदी सरकार', घोषणेचे निर्माते पियुष पांडे यांचं निधन

point

जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस हरपला

Piyush Pandey passes away : 'अबकी बार मोदी सरकार' या घोषणेचे निर्माते आणि जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस पीयूष पांडे यांचं निधन झालंय. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांनी 'मिले सुर मेरा तुम्हारा' हे लोकप्रिय गाणं देखील लिहिलं होतं. पीयूष पांडे यांच्या निधनाची कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, त्यांना इन्फेक्शन झालं होतं आणि ते त्याविरोधात लढत होते. त्यांच्या मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

पीयूष पांडे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं की, पीयूष पांडे त्यांच्या सृजनशीलतेसाठी ओळखले जायचे. जाहिरात क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं. त्यांच्याशी झालेले माझे संभाषण मी येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत आठवणीत ठेवेन. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. 

हेही वाचा : PSI कडून 5 महिने अत्याचार, नातेवाईकांकडूनही गंभीर आरोप, महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे
 

तरुण वयातच जाहिरात क्षेत्रात पदार्पण

पीयूष पांडे यांनी अवघ्या 27 व्या वर्षी जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी त्यांचा भाऊ प्रसून पांडे यांच्यासोबत करिअरची सुरुवात केली होती. दोघांनी मिळून दैनंदिन वापराच्या उत्पादनांसाठी रेडिओ जिंगल्सना आपला आवाज दिला होता. 1982 मध्ये त्यांनी ‘ओगिल्वी’ या नामांकित जाहिरात कंपनीत प्रवेश केला. 1994 मध्ये त्यांची कंपनीच्या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली. 2016 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले, तर 2024 मध्ये LIA लिजेंड अवॉर्ड मिळाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp