विजय शिवतारेंचे जावई, मराठमोळे डॅशिंग माजी IPS शिवदीप लांडे निवडणूक लढणार, संपत्ती किती?
मराठमोळे माजी IPS अधिकारी शिवदीप लांडे हे बिहार विधानसभा निवडणूक लढवत आहेत. नुकताच त्यांनी त्यांचा निवडणूक अर्जही भरला. ज्यामधून त्यांची नेमकी किती संपत्ती आहे हे समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

पटना: सिंघम अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवलेले महाराष्ट्राचे सुपुत्र शिवदीप लांडे हे आता बिहारच्या राजकारणात उतरले आहेत. जवळपास 19 वर्षे IPS अधिकारी राहिलेल्या लांडे यांच्या नव्या इनिंगची जोरदार चर्चा सुरु आहे. आता त्यांची संपत्ती किती आहे याची देखील माहिती समोर आहे. शिवाय त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का याबाबतची माहितीही समोर आली आहे. याच सगळ्याबाबत आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया.
कोण आहेत शिवदीप लांडे?
शिवदीप लांडे हे मुळचे अकोल्याचे आहोत. तिथेच त्यांचे शालेय शिक्षणही झाले. तर शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांचे ते जावई आहेत. शिवतारे यांची कन्या ममता आणि शिवदीप यांचा 2014 मध्ये विवाह झाला आहे. ममता या डॉक्टर असून या दोघांना एक मुलगीही आहे.
हे ही वाचा>> मोदींचा भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर संजय राऊत यांची बोचरी टीका, म्हणाले, 'तात्या विंचू येऊन गळा दाबेल'
शिवदीप लांडेंची नेमकी संपत्ती किती?
शिवदीप लांडे यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. IG लेव्हलचे अधिकारी राहिलेल्या लांडेंविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे 20 लाखांहून अधिकची रक्कम बँकेत आहे तर विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी 6 कोटी 65 लाख रुपये गुंतवले असल्याची माहिती आहे. त्यांनी आपला पत्ता हा कदमकुआ पटना असा दिला आहे.
याशिवाय शिवदीप लांडे यांच्याकडे 20 लाखांची एक गाडी देखील आहे. तर 2 कोटी 50 लाखांचं कर्ज असल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. शिवदीप लांडेंच्या पत्नी ममता या बिजनेस वुमेन आहेत. त्यांच्याकडे 100 ग्राम सोने आहे.










