मोदींचा भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर संजय राऊत यांची बोचरी टीका, म्हणाले, 'तात्या विंचू येऊन गळा दाबेल'
Mahesh Kothare : मराठी मनोरंजनसृष्टीचे निर्माते, अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईत भाजपचाच महापौर होणार असं वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर आता संजय राऊत यांनी महेश कोठारेंना खरपूस समाचार घेतला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना?

काय म्हणाले महेश कोठारे?
Mahesh kothare : मराठी मनोरंजनसृष्टीचे निर्माते, अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईत भाजपचाच महापौर होणार असं वक्तव्य केलं. ते एवढ्यावरच न थांबता ते म्हणाले की, मी भाजपचा भक्त आहे, मी मोदींजींचा भक्त असल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत महेश कोठारेंवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत महेश कोठारेंबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी खोचक उत्तर दिले.
हे ही वाचा : FB वरून महिलेशी केली मैत्री, अडीच वर्षे केले लैंगिक शोषण, मुलासह नवऱ्यालाही... रायगड हादरलं!
महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना?
मुंबईत महापौर हा मुंबईचाच होईल, असे वक्तव्य महेश कोठारे यांनी केलं. यावर संजय राऊत यांनी महेश कोठारेंवर टीका केली की, महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असुद्या. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण, तुम्ही कलाकार आहात, तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत, असं म्हणत संजय राऊतांनी महेश कोठारेंच्या वक्तव्यावर समाचार घेतला.
'...तर तात्या विंचू तुम्हाला चावेल'
त्यानंतर संजय राऊतांनी मिश्कील टोला देत वक्तव्य केलं की, जर तुम्ही असे बोलला तर तात्या विंचू येईल, तुम्हाला चावेल. रात्री येऊन तुमचा गळाच दाबेल, असं संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले महेश कोठारे?
दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमात मागाठाणे येथे महेश कोठारे यांनी भाजपावर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले की, भाजप म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वत: भाजपचा भक्त आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे.