FB वरून महिलेशी केली मैत्री, अडीच वर्षे केले लैंगिक शोषण, मुलासह नवऱ्यालाही... रायगड हादरलं!
Raigad crime : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने फेसबुकवर तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर त्याच तरुणीवर अडीच वर्षांपासून लैंगिक शोषण करत तिला ब्लॅकमेल केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आरोपीची तरुणीशी फेसबुकवर मैत्री

व्हिडिओचा वापर करत महिला ब्लॅकमेल
Raigad Crime : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने फेसबुकवर तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर त्याच तरुणीवर अडीच वर्षांपासून लैंगिक शोषण करत तिला ब्लॅकमेल केलं. त्यानंतर तरुणीने धाडस दाखवत पोलिस ठाणे गाठत सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर महाड पोलिसांनी चक्र फिरवित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
हे ही वाचा : मुलीच्या छेडछाडीनंतर डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये तुफान राडा, लोखंडी सळ्यांसह दांडक्यांनी रिक्षांची तोडफोड
आरोपीची तरुणीशी फेसबुकवर मैत्री
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची तरुणीशी फेसबुकवर मैत्री झाली. त्यानंतर सततच्या बोलण्याने त्यांच्यात जवळीकता वाढू लागली. त्यानंतर त्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले. तृण एवढ्यावरच न तज्ज्म्बत त्याने शरीरसंबंध ठेवल्याचे एकूण व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले. तिचे फोटोही काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
फोटो आणि व्हिडिओचा वापर करत महिला ब्लॅकमेल
फोटो आणि व्हिडिओचा वापर करत महिलेला सतत ब्लॅकमेल केलं. फोटो व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकीही देण्यात आली. शेवटी महिला हा सर्व प्रकार सहन करत राहिली, ही गेली अडीच वर्षे सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर पतीसह मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेनं निमूटपणे सारं काही सहन केलं.
हे ही वाचा : शनिवार वाड्यात नमाज पठणावरून वादंग, मेधा कुलकर्णी रस्त्यावर, हिंदू संघटना एकवटताच गोमूत्राने केलं शुद्धीकरण
38 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल
गेली अडीच वर्षे हे सर्व भोगल्यानंतर पीडितेनं महाड पोलिस ठाणे गाठत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 38 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आणि आरोपाला अटक केली. या प्रकरणात महाड पोलिसांनी लक्ष घालत पुढील तपास सुरू केला आहे.