शनिवार वाड्यात नमाज पठणावरून वादंग, मेधा कुलकर्णी रस्त्यावर, हिंदू संघटना एकवटताच गोमूत्राने केलं शुद्धीकरण
Medha Kulkarni : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात ऐन दिवाळी सणातच शनिवार वाड्याच नमाज पाठणावरून वादंग निर्माण झाला. पेशव्यांच्या शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिला नमाज पठण करताना दिसत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आता भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्हि़डिओ सोशल मीडियावर शेअर करत हा ऐतिहासिक वारशाचा अवमान असल्याचं म्हटलं आहे. त
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शनिवार वाड्यात नमाज पाठणावरून वादंग

सकल हिंद समाज एकत्र

मेधा कुलकर्णी रस्त्यावर

नेमकं त्या दिवशी घडलं काय?
Medha Kulkarni : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात ऐन दिवाळी सणातच शनिवार वाड्यात नमाज पाठणावरून वादंग निर्माण झाला. पेशव्यांच्या शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिला नमाज पठण करताना दिसत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आता भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्हि़डिओ सोशल मीडियावर शेअर करत हा ऐतिहासिक वारशाचा अवमान असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी हे सर्व मतांचं ध्रुवीकरण करण्याचं काम सुरु असल्याचं म्हणत मेधा कुलकर्णींवर टीका केली.
हे ही वाचा : पुणे तिथे काय उणे! पोलिसांनी ट्रक थांबवला, अचानक ड्रायव्हरचा पाराच चढला, भररस्त्यातच पोलिसाला जबर मारहाण
एकूण प्रकरण काय?
19 ऑक्टोबर रविवारी रोजी मेधा कुलकर्णी यांनी सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शनिवार वाडा संकुलात जोरदार निदर्शने केली आणि प्रार्थनास्थळ शुद्ध करण्यासाठी त्यावर गोमूत्र आणि शेण शिंपडण्यात आले. पोलीस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या या संघर्षामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि पोलिसांनी नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम केले.
खरंतर, शनिवारी पुण्यातील शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिला या नमाज अदा करताना दिसत होत्या. व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते की, पाच ते सहा मुस्लिम महिला नमाज अदा करत होते. त्याच ठिकाणी काही पर्यटक फिरताना दिसत होते. संबंधित सोशल मीडियावर जशा व्हायरल झाला, त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले. याच प्रकरणी आता मेधा कुलकर्णी यांनीही 'x' वर पोस्ट शेअर केली.