पुणे तिथे काय उणे! पोलिसांनी ट्रक थांबवला, अचानक ड्रायव्हरचा पाराच चढला, भररस्त्यातच पोलिसाला जबर मारहाण

मुंबई तक

pune crime : पुण्यातच ट्रक ड्रायव्हरने एका पोलिसावर बेदम हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरेपींना अटक करण्यात आली आहे, नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

pune crime
pune crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ

point

ट्रक ड्रायव्हरकडून पोलिसावर हल्ला

point

नेमकं प्रकरण काय?

Pune Crime : पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होताना दिसते. पुण्यातील गुन्हेगारी कधी ना कधी थांबेल असे पुणेकरांना वाटते. पण, पुण्यात दिवसेंदिवस नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच पुण्यातच ट्रक ड्रायव्हरने एका पोलिसावर बेदम हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरेपींना अटक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मार्केट यार्ड परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'ओंकार' हत्तीचा धुमाकूळ, दुचाकी पाय ठेवून चिरडून टाकली; व्हिडीओ व्हायरल

ट्राफीक पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला

वाहतूक नियंत्रक करताना एका ट्रक ड्रायव्हरसह त्याच्या साथीदारांनी ट्राफीक पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात हवालदार गंभीरपणे जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित हवालदाराचे नाव सुभाष साळुंखे (वय 39) असे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत तीन आरोपींना बेड्या ठोकण्याचे काम केले आहे. 

आरोपी सुमीत सुभाष सरकटे, मनजीत कांबळे, अक्षय नानासाहेब कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. या एकूण प्रकरणात महेश साळुंखे यांनी तक्रार दाखल केली. या एकूण तक्रारीनुसार, आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. वाहतूक पोलीस हवालदार हे बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : मुंबई: रागाच्या भरात वडिलांचं निर्घृण कृत्य! 14 वर्षीय मुलीची जड वस्तूने हल्ला करत हत्या अन् पत्नी गंभीररित्या जखमी

थोडक्यात प्रकरण

मिळालेल्या एकूण माहितीनुसार, पोलीस अधिकारी साळुंखे हे ड्युडी करून मार्केट यार्ड परिसरातून येत होते. त्याच ठिकाणी एक प्रचंड वेगाने ट्राक येत होता, तेव्हा त्यांनी तो ट्राक थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचक्षणी नागरिक आणि ट्रक चालकांमध्ये बाचाबाची झाली. साळुंखे यांनी हस्तक्षेप करत ट्रक चालकाने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतलं, तसेच हवालदारावर हल्ला केला. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या साळुंखेंना रुग्णालयात दाखल केले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp