रात्री पार्टीत तिन्ही मित्रांमध्ये वाद झाला अन् दोघांनी मिळून तिसऱ्याचं गुप्तांगच कापून टाकलं...
किरकोळ वादातून दोन मित्रांनी त्यांच्या एका मित्राचे गुप्तांग कापून टाकल्याचं सांगितलं जात आहे. तिघेही मित्र रात्री पार्टी करत असताना ही घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रात्री पार्टीत तिन्ही मित्रांमध्ये वाद झाला
दोघांनी मिळून तिसऱ्याचं गुप्तांगच कापून टाकलं...
Crime News: उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून दोन मित्रांनी त्यांच्या एका मित्राचे गुप्तांग कापून टाकल्याचं सांगितलं जात आहे. तिघेही मित्र रात्री पार्टी करत असताना ही घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान, तिघांनीही खूप मद्यपान केले. त्यानंतर, दोन मित्रांचा पीडित तरुणासोबत कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. या वादातूनच दोघांनी त्यांच्या स्वतःच्या मित्राचं गुप्तांग कापून टाकलं.
तिसऱ्या तरुणाचं गुप्तांग चाकूने कापलं
आता, पीडित तरुणाची प्रकृती सध्या गंभीर असून त्याच्यावर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही संपूर्ण घटना रॉबर्ट्सगंज पोलीस स्टेशन हद्दीतील चुर्क चौकी परिसरात घडली. काल रात्री तीन मित्र पार्टीमध्ये खूप मद्यपान करत होते. त्याच दरम्यान, तिन्ही तरुणांमध्ये कोणत्या तरी किरकोळ वाद झाला आणि त्यांच्यात मारहाण सुरू झाली. यानंतर दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या तरुणाचं गुप्तांग चाकूने कापून टाकलं आणि आरोपी तरुण तिथून पळून गेल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा: पुण्यातील उच्च शिक्षित तरुणाचे अल-कायदा दहशतवादी संघटनेशी संबंध, ATS ने कोंढव्यातून उचललं
स्थानिकांना सुद्धा या धक्कादायक घटनेची माहिती मिळाली आणि त्यानंतर, त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून 28 वर्षीय जखमी तरुणाला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई मेट्रो-3 ला मिळणार पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग... कुठे बनणार नवा मार्ग?
मद्यपान करत असताना झाला वाद
पोलिस चौकशीदरम्यान, पीडित तरुणाने सांगितलं की तो त्याचे मित्र राजेश आणि भवानी यांच्यासोबत रात्री पार्टी करत होता. पार्टीमध्ये त्याचं त्याच्या मित्रांसोबत मोठं भांडण झालं आणि त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्यावर चाकून हल्ला केला. आता, पोलिसांनी या प्रकरणाबाबच गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींची चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.










