जिथं पाकिस्ताननं हल्ला केल्याचा दावा केला, तिथंच PM मोदी पोहोचले... जवानांसोबत काय घोषणा दिल्या?
पंतप्रधान मोदी यांनी X वर पोस्ट करत म्हटले, "आज सकाळी मी आदमपूर हवाई तळाला भेट दिली आणि आमच्या शूर हवाई योद्ध्यांशी व सैनिकांशी भेटलो. धैर्य, निश्चय आणि निर्भयता यांचं प्रतीक असलेल्या या शूर-वीरांसोबत वेळ घालवणं हा एक खास अनुभव होता."
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूर हवाई दलाच्या तळावर

पंतप्रधान मोदी यांचा एअर फोर्सच्या जवानांशी संवाद

मोदींकडून 'भारत माता की जय'ची घोषणाबाजी
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली आणि सैनिकांशी संवाद साधला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर या भेटीने जगाचं लक्ष वेधलं आहे. कारण हे तेच हवाई दलाचं तळ आहे जिथे हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.
हे ही वाचा >> जम्मू-काश्मीमध्ये मोठी चकमक, सैन्याने दशतवाद्यांना घेरलं, 1 ठार.... ते' पोस्टर्स लावलेल्या भागात काय घडलं?
पाकिस्तानने 9 आणि 10 मे च्या मध्यरात्री भारताच्या "ऑपरेशन सिंदूर" नंतर आदमपूर येथील हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने दावा केला की, त्यांच्या जेएफ-17 लढाऊ विमानांमधून डागलेल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी आदमपूर येथील भारताची एस-400 हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली. मात्र, भारतीय अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला.
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं?
पंतप्रधान मोदी यांनी X वर पोस्ट करत म्हटले, "आज सकाळी मी आदमपूर हवाई तळाला भेट दिली आणि आमच्या शूर हवाई योद्ध्यांशी व सैनिकांशी भेटलो. धैर्य, निश्चय आणि निर्भयता यांचं प्रतीक असलेल्या या शूर-वीरांसोबत वेळ घालवणं हा एक खास अनुभव होता. आपल्या राष्ट्रासाठी सैन्य जे काही करतंय, त्याबद्दल भारत त्यांचा कायम ऋणी राहील." दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासोबत त्यांनी सैनिकांसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणाही दिल्या.
हे ही वाचा >> sscresult.mahahsscboard.in, MSBSHSE SSC Result 2025: 10वीचा निकाल अखेर जाहीर, राज्याचा किती टक्के निकाल?
दरम्यान, गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 7 मे रोजी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. पंतप्रधानांनी काल झालेल्या त्यांच्या संभाषणातच देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांचे कौतुक केलं होतं.