sscresult.mahahsscboard.in, MSBSHSE SSC Result 2025: 10वीचा निकाल अखेर जाहीर, राज्याचा किती टक्के निकाल?

मुंबई तक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

MSBSHSE SSC Result 2025: 10वीचा निकाल अखेर जाहीर
MSBSHSE SSC Result 2025: 10वीचा निकाल अखेर जाहीर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दहावीचा निकाल अखेर जाहीर

point

पाहा राज्याचा एकूण निकाल किती टक्के?

point

कोणत्या विभागाने मारली बाजी?

Maharashtra SSC Result 2025: पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावी 2025 निकाल (Maharashtra SSC result 2025) जाहीर करण्यात आला आहे. यावेळी बोर्डाकडून केवळ निकालाची एकूण टक्केवारी आणि विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल हा 94.10 टक्के एवढा लागला आहे. महाराष्ट्र बोर्ड कोणत्याही टॉपर्सची यादी ही जाहीर करत नाही.

दरम्यान, दुपारी 1 वाजता नेमका निकाल जाहीर करणार आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाइन निकाल पाहता येईल. तसंच त्यांची मार्कशीटही वेबसाइटवरून डाऊनलोड करून घेता येईल.

 हे ही वाचा>> 10th Result 2025: दहावीचा निकाल मोबाइल आणि mahresult.nic.in वेबसाइटवर कसा पाहाल?

पाहा विभागनिहाय निकाल

  1. कोकण – 99.82%
  2. कोल्हापूर – 96.78%
  3. मुंबई – 95.84%
  4. संभाजीनगर – 92.82%
  5. अमरावती – 92.95%
  6. पुणे – 94.81%
  7. नाशिक – 93.04%
  8. नागपूर – 90.78%
  9. लातूर – 92.77%

राज्यात पुन्हा एकदा कोकण अव्वल स्थानावर असून, त्यानंतर कोल्हापूर विभागाचा नंबर आहे. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई तर चौथ्या क्रमांकावर पुणे विभाग आहे. तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर नाशिक आणि अमरावती विभाग आहे. तर त्यानंतर संभाजीनगर आणि लातूर हे विभाग आहेत. तर नागपूर विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा>> SSC Result 2025 : दहावीचा रिझल्ट उद्या होणार जाहीर...'या' आहेत निकालाविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी

'या' वेबसाइट्सवर पाहता येईल दहावीचा निकाल

  1. https://results.digilocker.gov.in
  2. https://sscresult.mahahsscboard.in  
  3. http://sscresult.mkcl.org
  4. https://results.targetpublications.org
  5. https://results.navneet.com
  6. https://www.indiatoday.in/education-today/results
  7. https://www.aajtak.in/education/board-exam-results

दहावीचा 2024 साली किती टक्के लागला होता निकाल?

2024 मध्ये दहावीच्या परीक्षेला बसलेल्या मुलींचा निकाल 97.21 टक्के लागला होता. तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला होता. कोकण मंडळाचा 99.01 टक्के हा सर्वाधिक निकाल लागला होता. तर सर्वात कमी निकाल (99.01%) नागूपर विभागात लागला होता. राज्यातील 9382 शाळांमध्ये 100 टक्के निकाल लागला होता.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp