SSC Result 2025 : दहावीचा रिझल्ट उद्या होणार जाहीर...'या' आहेत निकालाविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी
SSC Result 2025 Latest Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) दहावीचा निकाल उद्या मंगळवारी 13 मे 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दहावीच्या निकालाची ग्रेडिंग सिस्टम कशी असते?

कोणत्या वेबसाईटवर पाहू शकता निकाल?

दहावीच्या निकालाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
SSC Result 2025 Latest Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) दहावीचा निकाल उद्या मंगळवारी 13 मे 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे. हा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने घोषित केला जाणार आहे. बोर्डाकडून पत्रकार परिषदेत विभागनिहाय निकालाची माहिती देण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in हा निकाल पाहता येणार आहे. निकालाबाबतच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..
या वेबसाईट्सवर पाहू शकता निकाल
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com
https://www.indiatoday.in/education-today/results
https://www.aajtak.in/education/board-exam-results
हे ही वाचा >> PM Modi LIVE: Ceasefire कराराच्या 2 दिवसांनी PM मोदी देशाशी काय बोलणार? उरले अवघे काही तास...
गतवर्षी 2024 मध्ये दहावीचा निकाल किती टक्के लागला होता?
2024 मध्ये दहावीच्या परीक्षेला बसलेल्या मुलींचा निकाल 97.21 टक्के लागला होता. तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला होता. कोकण मंडळाचा 99.01 टक्के हा सर्वाधिक निकाल लागला होता. तर सर्वात कमी निकाल (99.01%) नागूपर विभागात लागला होता. राज्यातील 9382 शाळांमध्ये 100 टक्के निकाल लागला होता.
दहावीच्या निकालाची ग्रेडिंग सिस्टम कशी असते?
75% आणि त्यापुढे – Distinction
60% आणि त्यापुढे – प्रथम श्रेणी (First Class)
45% to 59% – द्वितीय श्रेणी (Second Class)
35% to 44% – उत्तीर्ण श्रेणी (Pass Class)
35% पेक्षा कमी – अनुत्तीर्ण (Fail)