जम्मू-काश्मीमध्ये मोठी चकमक, सैन्याने दशतवाद्यांना घेरलं, 1 ठार.... ते' पोस्टर्स लावलेल्या भागात काय घडलं?
शोपियानच्या अनेक भागात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविषयी माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून मोठ्या कारवाईला सुरूवात

ऑपरेशन सिंदूरनंतर आता लष्कराची जम्मू काश्मीरमध्येही मोहीम
Jammu Kashmir : पहलगाम हल्ल्यानंतर, लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सीमेपलीकडील दहशतवादी छावण्यांवर कारवाई केल्यानंतर, आता सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली आहे. शोपियानसह विविध भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून मोहीम सुरू केली आहे.
हे ही वाचा >> बनावट दारू प्यायल्याने तब्बल 14 जणांचा मृत्यू, 6 जण रुग्णालयात... धक्कादायक घटनेनं दोन गावं हादरली
काश्मीरमध्ये आज सकाळीच एका कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरलं. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारलं आहे. शोपियानच्या जामपाथरीमध्ये एन्काउंटर सुरू आहे. घटनास्थळी अजूनही किमान दोन दहशतवादी लपले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शोपियानच्या अनेक भागात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविषयी माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केलं आहे. त्याच भागात ही चकमक झाली. पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम आक्रमकपणे सुरू केली आहे.
हे ही वाचा >> पाकिस्तानच्या पुन्हा कुरापती? जम्मू काश्मीरमधील सांबामध्ये दिसले संशयास्पद ड्रोन, आर्मीने काय म्हटलं?
दरम्यान, सुरक्षा दलांनी सार्वजनिक ठिकाणी विविध ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या दहशतवाद्यांचे फोटो एजन्सींनी आधीच प्रसिद्ध केले होते. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने घेतली आहे.