DRDO Recruitment 2026 : फ्रेशर्ससाठी डीआरडीओमध्ये संधी, अप्रेंटिससाठी सुरु झालीये भरती; लगेच अर्ज करा

मुंबई तक

• 09:38 AM • 08 Apr 2026

फ्रेशर्स साठी आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्त्वाची संधी चालून आली आहे. DRDO मध्ये अप्रेंटिसपदासाठी भरती सुरु झाली आहे. अर्ज कसा करावा आणि अर्जाची शेवटची तारीख काय आहे, जाणून घ्या.

DRDO Recruitment 2026

DRDO Recruitment 2026

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डीआरडीओमध्ये फ्रेशर्ससाठी अप्रेंटिसची संधी

point

मानधनही दिले जाणार

point

जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

DRDO Recruitment 2026 : फ्रेशर्स साठी आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्त्वाची संधी चालून आली आहे. भारत सरकारच्या डीआरडीओ (DRDO) मध्ये तुम्ही काम करु शकता. डीआरडीओने नुकतीच याविषयी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अॅण्ड अलायड सायन्स (INMAS) या दिल्लीमध्ये असणाऱ्या संस्थेसाठी ही भरती होणार आहे. या भरती अंतर्गत पदवीधर डिप्लोमा आणि आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांकडून विविध विषयांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 

हे वाचलं का?

'या' उमेदवारांना मिळणार संधी

या भरती प्रक्रियेत पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी एकूण 25 जागा असून यामध्ये B. Sc, B. Pharma आणि B. LI.Sc. पदवीधरांचा समावेश आहे. त्यांना प्रति महिना 12, 300 रुपये विद्यावेतन दिले जाईल. डिप्लोमा झालेल्या उमेदवारांसाठी एकूण 9 जागा असून यामध्ये कॉम्प्युटर सायन्स, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी आणि ऑफिस मॅनेजमेंट या विषयांचा समावेश आहे. या उमेदवारांना प्रति महिना 10,900 रुपये विद्यावेतन मिळेल. तसेच, आयटीआय उमेदवारांसाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कोपा (COPA) ट्रेडमध्ये एकूण 4 जागा असून त्यांना प्रति महिना 9,600 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.

हे ही वाचा : बापरे.. अवघ्या काही तासात ट्रम्प टाकणार इराणवर अणूबॉम्ब? अवघ्या जगाची उडाली झोप!

पात्रता आणि अटी

उमेदवारांनी त्यांचे संबंधित शिक्षण सन 2022 किंवा त्यानंतर पूर्ण केलेले असावे. त्यापूर्वी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. अर्जदार केवळ नियमित विद्यार्थी म्हणून उत्तीर्ण झालेला असावा.  याशिवाय, पदव्युत्तर (Post-graduation) पदवी असलेले उमेदवार या प्रशिक्षणासाठी पात्र नसतील. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात अवकाळीचं संकट टळलं, मात्र 'या' जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकणार

अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धत

अर्जाची शेवटची 30 एप्रिल 2026 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीमच्या (NATS) अधिकृत पोर्टलवर (www.mhrdnats.gov.in) नोंदणी करणे अनिवार्य आहे. तांत्रिक विषयांच्या उमेदवारांनी INMAS च्या युजर आयडीद्वारे पोर्टलवर अर्ज करावा. उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल आणि केवळ निवड झालेल्या उमेदवारांनाच कळवण्यात येईल. अधिक माहितीसाठी उमेदवार hrd.inmas@gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.