Ganesh Chaturthi 2025: उद्या म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. अनेकांच्या घरात तसेच विविध सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांची लगबग सुरू असते आणि अनेक मंडळांनी मूर्ती मंडळांमध्ये नेण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या काही महिन्यांपूर्वीच आकर्षक रंगसंगती आणि सुबक मुर्तींसाठी मोठ्या प्रमाणात कला केंद्रांमध्ये तसेच मुर्तींच्या कारखान्यांमध्ये बुकिंग केल्या जातात. नागरिक कारखान्यांतून किंवा चित्रशाळांमधून गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवून घेतात. मात्र, या सणाच्या पार्श्वभूमीवर एका कला केंद्रातील मूर्तिकार अचानक फरार झाल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
एकाकी लोड आल्याने मूर्तीकाराचं पलायन
डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार अचानक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविकांनी या कला केंद्रात गणेश मूर्तींची बुकिंग केली होती. मात्र, जास्तीच्या ऑर्डर्स घेतल्यामुळे आणि एकाकी लोड आल्याने मूर्तिकाराने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
पोलिसांना दिली माहिती
मूर्तिकार पळून गेल्याने गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांना हाताला मिळेल ती मूर्ती कारखान्यातून घेऊन जावी लागली. अनेक जणांचे बुकिंगचे पैसे अडकले आहेत. दरम्यान, गणेश भक्तांनी मूर्तिकाराविरोधात आवाज उठवला असून, संबंधित घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: गणेशभक्तांनो! 10 दिवसानंतरच का करतात गणपती बाप्पाचं विसर्जन? यामागची रंजक कहाणी माहितीये का?
काही महिन्यांपूर्वीच मूर्तींचं बुकिंग
गणेशोत्सवाच्या काही महिने आधी मूर्तींचे बुकिंग केले जाते कारण गणेशोत्सवाचा काळ जवळ आल्यावर अनेक मूर्तिकार व्यस्त असतात आणि भाविकांची मोठी गर्दी होते, त्यामुळे इच्छित मूर्ती वेळेवर मिळवण्यासाठी लोकांना आधीच नोंदणी करावी लागते. यामुळे मूर्तिकारांनाही वेळेत मूर्ती बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि भाविकांना त्यांच्या आवडीच्या मूर्ती मिळण्याची खात्री होते. आधीच बुकिंग केल्याने ते ऐनवेळी होणाऱ्या गर्दीतून वाचतात आणि त्यांना हवी तशी मूर्ती वेळेवर मिळते. हाच विचार करून भाविकांनी डोंबिवलीतील कला केंद्रात मूर्तींची ऑर्डर दिली होती. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त ऑर्डर्स झाल्याने एकाकी लोड आला आणि त्यामुळे तो अचानक पळून गेल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
