गणेश चतुर्थी 2025: गणेशभक्तांनो! 10 दिवसानंतरच का करतात गणपती बाप्पाचं विसर्जन? यामागची रंजक कहाणी माहितीये का?

गणेश चतुर्थी फक्त 10 दिवसच का साजरी केली जाते? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

10 दिवसानंतर का करतात गणपती बाप्पाचं विसर्जन?

10 दिवसानंतर का करतात गणपती बाप्पाचं विसर्जन?

मुंबई तक

• 05:00 AM • 26 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

गणेश चतुर्थी 10 दिवसच का साजरी केली जाते?

point

यामागची रंजक कहाणी जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2025: दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव एकूण 10 दिवस चालतो. हे 10 दिवस गणपती बाप्पा भक्तांच्या घरात विराजमान होतात आणि सर्व भक्त त्यांची मनोभावे पूजा करतात. पहिल्या दिवशी गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते आणि शेवटच्या दिवशी त्यांचं विसर्जन करण्याची परंपरा आहे. गणेश चतुर्थी फक्त 10 दिवसच का साजरी केली जाते? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

हे वाचलं का?

पुराणांमध्ये सांगितलं महत्त्व

भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते आणि हे 10 दिवस बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान होतात. पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला होता. म्हणून, या दिवसापासून गणेशोत्सवाची सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन केलं जातं.

हे ही वाचा: मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता लोकल ट्रेन अधिक वेगानं धावणार... पश्चिम रेल्वेकडून मोठी अपडेट

10 दिवस गणेश चतुर्थी साजरी करण्यामागचं कारण... 

खरंतर, वेद व्यासजींनी गणरायाला महाभारत ग्रंथ लिहिण्याची विनंती केली होती, तेव्हा बाप्पाने 10 दिवस एकही क्षण न थांबता  महाभारत लिहिलं होतं. जेव्हा वेदव्यासजींनी गणरायाकडे पाहिलं, तेव्हा बाप्पाचं तापमान खूप जास्त वाढलं होतं. यामुळेच त्यांनी 10 व्या दिवशी गजाननाला नदीत आंघोळ घातली. याच कारणामुळे 10 दिवस गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. इतिहासकारांच्या मते, पेशव्यांच्या काळापासून 10 दिवस गणेश चतुर्थी साजरी करण्याची प्रथा सुरू आहे. 

हे ही वाचा: मनसेला मतं पडतात जर सगळंच काढलं तर 10-12 वर्षांचा खेळ... मतांच्या चोरीवरून राज ठाकरेंचं रोखठोक विधान

बरेच लोकांच्या घरात दीड दिवस, 3 दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवस बाप्पा विराजमान होतात आणि नंतर त्याचं विसर्जन करतात. गणेश चतुर्थीच्या या 10 दिवसांत भक्ती आणि उत्सवाचं वातावरण असतं. या काळात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लोक एकत्र भक्तिगीते गातात. हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर लोकांना एकत्र आणणारा सामाजिक उत्सव देखील आहे.

    follow whatsapp