हनिमूनच्या रात्री नवरदेव रुममध्ये आला आणि नवरीच्या हातात दिलं प्रेग्नंसी किट, पुढे घडलं भयंकर...

Groom And Bride Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील एका गावात नवरा-नवरीच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री मोठं कांड घडलं.

Groom And Bride Viral News

Groom And Bride Viral News

मुंबई तक

14 Jul 2025 (अपडेटेड: 14 Jul 2025, 03:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्नानंतर चक्कर येऊन खाली पडली नवरी

point

प्रेग्नन्सी किट घेऊन नवरीजवळ गेला अन् घडलं..

point

नवरीच्या माहेरची मंडळी घरी पोहोचली अन्..

Groom And Bride Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील एका गावात नवरा-नवरीच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री मोठं कांड घडलं. सुहागरातच्या वेळी नवरी नवऱ्यावर भडकली. याचदरम्यान तिने लगेच माहेरच्यांना फोन केला. त्यानंतर नवरीच्या माहेरची मंडळी तातडीनं तिच्या घरी पोहोचली. वरातीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर नवरी सायंकाळी सासरच्या घरी गेली. त्यावेळी ती खूप थकलेली होती, असं समजते. गरमी असल्याने ती चक्कर येऊन खाली पडली होती. त्यानंतर नवरा घाबरला होता. त्याने याबाबत तातडीनं त्याच्या मित्रांना कळवलं. त्यानंतर मित्रांनी असं काही सांगितलं, जे ऐकून नवऱ्याला धक्काच बसला. 

हे वाचलं का?

लग्नानंतर चक्कर येऊन खाली पडली नवरी

नवरा सुहागरातवेळी नवरीजवळ प्रेग्नन्सी टेस्ट किट घेऊन गेला होता. नवऱ्याने हे सर्व त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून केलं होतं. जेव्हा नवरी चक्कर येऊन खाली पडली होती. तेव्हा नवऱ्याच्या मित्रांनी विनोद करत म्हटलं, हे गर्भवती असल्याचं लक्षण असू शकतो. नवऱ्याला या गोष्टीवर संशय आला. त्याने रात्रीच गावातील एका मेडिकल स्टोअरमध्ये प्रेग्नन्सी किट खरेदी केलं. 

प्रेग्नन्सी किट घेऊन नवरीजवळ गेला अन् घडलं..

याचदरम्यान, रात्री जेव्हा दोघेही रुममध्ये आले, तेव्हा नवऱ्याने सुहागरातच्या वेळी नवरीला प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगितलं. हे ऐकून नवरीला प्रचंड राग आला आणि तिने थेट तिच्या वहिनीला कॉल केला. नवरीने तिला सांगितलं की, तिचा पती तिच्यावर संशय घेतो. 

नवरीच्या माहेरची मंडळी घरी पोहोचली अन्..

त्यानंतर नवरीच्या वहिनीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर नवरीचे कुटुंबीय तिच्या सासरी पोहोचले. त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला. गावातील लोकांनी दोन्ही कुटुंबियांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गावकऱ्यांनी बैठक घेतली. त्यावेळी नवरीने नवऱ्याच्या संशयी भूमिकेबाबत सर्वांना सांगितलं. त्यानंतर नवऱ्यानेही त्याची भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, मित्रांच्या सांगण्यावरून मी चुकीचं केलं. यापुढे मी अशाप्रकारची चूक करणार नाही, असंही तो म्हणाला. 

    follow whatsapp