Ram Mandir : गर्भगृहात स्थान न मिळालेल्या रामलल्लाच्या ‘त्या’ दोन मूर्ती, कुठे पाहायला मिळणार?

रोहिणी ठोंबरे

• 01:21 PM • 26 Jan 2024

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी विधिवत पार पडला. ही मूर्ती म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे.

In Ayodhya Ram Mandir Ram lalla two Idols which could not find place in sanctum sanctorum Where they will get Place

In Ayodhya Ram Mandir Ram lalla two Idols which could not find place in sanctum sanctorum Where they will get Place

follow google news

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) गर्भगृहात रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी विधिवत पार पडला. ही मूर्ती म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. मात्र, गर्भगृहात रामलल्लाच्या तीन मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गर्भगृहात असलेल्या रामलल्लाच्या मूर्तीशिवाय (Ram Lalla Idol) इतर दोन मूर्तींचे फोटोही समोर आले आहेत. (In Ayodhya Ram Mandir Ram lalla two Idols which could not find place in sanctum sanctorum Where they will get Place )

हे वाचलं का?

23 जानेवारी रोजी रामलल्लाच्या दुसऱ्या मूर्तीचे फोटो समोर आले होते. माहितीनुसार, सत्य नारायण पांडे यांनी बनवलेली ही मूर्ती पहिल्या मजल्यावर स्थापित केले जाऊ शकते. तर तिसरी मूर्ती शिल्पकार गणेश भट्ट यांनी बनवली आहे. सध्या मंदिर परिसरात त्याची प्रतिष्ठापना झालेली नाही. केवळ त्याचे फोटो समोर आले आहेत. शास्त्रात रामाच्या मूर्तीचे ‘निलंबुजम् श्यामम् कोमलांगम्’ असं वर्णन करण्यात आलं आहे. त्यामुळे श्रीरामाच्या श्यामल रंगाच्या मूर्तीला गर्भगृहात स्थान देण्यात आले आहे.

वाचा : Maratha Reservation: ‘तो GR दिला तरी आझाद मैदानावर जाणारच, कारण…’, मनोज जरांगेंनी टाकला नवा डाव

गणेश भट्ट यांनी बनवलेल्या रामलल्लाच्या तिसऱ्या मूर्तीला राम मंदिराच्या गर्भगृहात स्थान मिळालेले नाही. या 51 इंच मूर्तीचे फोटो आता प्रसिद्ध करण्यात आले असून मंदिराच्या आवारात ही मूर्ती बसवण्यात येणार असल्याचे मंदिर ट्रस्टने सांगितले आहे. श्यामशिलेच्या या मूर्तीने रामभक्तांचेही लक्ष वेधून घेतले आहे.

तिसऱ्या मूर्तीची मंदिराच्या आवारात स्थापना होणार?

या मूर्तीमध्ये 5 वर्षांच्या रामलल्लाची प्रतिमा दिसते. ही 51 इंचाची मूर्ती कृष्ण शिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या पाषाणापासून बनवलेली आहे. जे कर्नाटकातील म्हैसूर येथील हेग्गदेवन कोटे यांच्या सुपीक जमिनीतून मिळाले आहे. मात्र, ही मूर्ती मंदिराच्या गर्भगृहासाठी निवडण्यात आली नाही. राम मंदिराचा कारभार पाहणाऱ्या ट्रस्टने गणेश भट्टाची मूर्ती मंदिर परिसरात बसवण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

वाचा : Manoj Jarange : शिंदे सरकारची जरांगेंनी उडवली झोप! ‘या’ मागण्यांमुळे अडचण

रामलल्लालाची भव्य-दिव्य मूर्ती तीन अब्ज वर्ष जुन्या खडकापासून केली गेली तयार

गर्भगृहात स्थापित करण्यासाठी निवडलेली मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. तीन अब्ज वर्ष जुन्या खडकावर त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक मूर्ती कोरली आहे. जो निळ्या रंगाच्या कृष्णा खडकासाठी ओळखला जातो. हा प्राचीन दगड म्हैसूरमधील गुज्जेगौदनापुरा गावातून उत्खनन करण्यात आला होता, ज्यामुळे पुतळ्यामध्ये शाश्वत भव्यतेचा एक घटक जोडला गेला होता.

अरुण योगीराज यांनी बनवलेली रामलल्लाची मूर्ती तीन मूर्तींमधून निवडली गेली. कारण, त्यात एक वेगळीच भव्यता दिसते. ही 5 वर्षाच्या रामाची प्रतिमा प्रतिबिंबित करते. मूर्तीचे डोळे कमळ नयनी आहेत. चेहऱ्याची आकर्षकता अशी आहे की भक्तांच्या मनात श्रीरामाची प्रतिमा तयार होते.

वाचा : जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा, ‘सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज द्या नाहीतर उद्या…’

51 इंचाची मूर्ती बनवण्यामागील कारण काय?

राम मंदिराच्या गर्भगृहात बसवण्यात आलेल्या मूर्तीची उंची अत्यंत विचारपूर्वक 51 इंचाची ठेवण्यात आली आहे. साधारणपणे, भारतात ५ वर्षाच्या मुलाची उंची 51 इंच असते. तसंच 51 हा शुभ अंक मानला जातो. त्यामुळेच गर्भगृहात स्थापन करण्यात येणाऱ्या मूर्तीचा आकारही 51 इंच ठेवण्यात आला आहे.

    follow whatsapp