Govt Job: 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. RBI कडून ग्रेड B ऑफिसरच्या एकूण 120 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 'आरबीआय'कडून या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. उमेदवार 30 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार opportunities.rbi.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या या भरतीच्या माध्यमातून ग्रेड B च्या एकूण 120 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
- ऑफिसर ग्रेड B General: 83 पद
- ऑफिसर ग्रेड B DEPR: 17 पद
- ऑफिसर ग्रेड B DSIM: 20 पद
RBI कडून आधीच उमेदवारांची भरती करण्यासाठी परीक्षेच्या तारखांची घोषणा केली गेली आहे. RBI च्या माहितीनुसार, 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी परीक्षा आयोजित केली जाईल. दिलेल्या तारखांच्या आत भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांचे परीक्षेत बसण्यासाठीचे प्रवेशपत्र परीक्षेच्या काही दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.
हे ही वाचा: इन्स्टाग्रामवर ओळख झाली..पाकिस्तानी तरुणाने विद्यार्थीनीला लग्नाचं प्रॉमिस केलं, बॉर्डर पार करण्याचा प्लॅन केला, पण पोलिसांनी...
काय आहे पात्रता?
या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑफिसर ग्रेड B General पदासाठी अर्ज करणाऱ्यासाठी किमान 60 टक्के गुणांसह ग्रॅज्युएशन, तसेच ऑफिसर ग्रेड B DEPR पदासाठी कोनॉमिक्स, Finance मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन/PGDM/ MBA आणि ऑफिसर ग्रेड B DSIM पदावर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांनी स्टॅटिक्स किंवा गणित विषयात पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच पदव्युत्तर असणं अनिवार्य आहे.
यासोबतच भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असणं आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: फ्लाइटमध्ये शेजारी बसली सुंदर महिला जुळलं सूत, पण फ्लाइट लँड झालं आणि 'त्या' गोष्टीमुळे...
अर्जाचं शुल्क
आरबीआय ग्रेड B पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 850 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. उमेदवारांकडून अर्जाचं शुल्क ऑनलाइन माध्यमातून स्विकारलं जाईल. एससी, एसटी प्रवर्गातील आणि अपंग उमेदवारांसाठी 100 रुपये अर्जाचं शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. अर्जाचं शुल्क मागील वर्षीच्या भरतीच्या आधारे असून यावर्षी बदल झाल्यास ती अपडेट होऊ शकते. भरतीच्या संबंधित माहितीसाठी उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
ADVERTISEMENT
