इन्स्टाग्रामवर ओळख झाली..पाकिस्तानी तरुणाने विद्यार्थीनीला लग्नाचं प्रॉमिस केलं, बॉर्डर पार करण्याचा प्लॅन केला, पण पोलिसांनी...

Today Shocking Viral News : बिहारच्या नवादा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली. येथील एक विद्यार्थीनी पाकिस्तानी तरुणाच्या जाळ्यात अडकली असती, पण ती थोडक्यात वाचली.

ADVERTISEMENT

Bihari Woman Shocking Viral News
Bihari Woman Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणी बुरका घालून घरातून निघाली अन्..

point

बॉर्डर पार करून पाकिस्तानमध्ये जाणार होती, पण..

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Today Shocking Viral News : बिहारच्या नवादा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली. येथील एक विद्यार्थीनी पाकिस्तानी तरुणाच्या जाळ्यात अडकली असती, पण ती थोडक्यात वाचली. पकडीबरांवा पोलीस विद्यार्थीनीला आणण्यासाठी प्रयागराजला रवाना झाले आहेत. रिपोर्टनुसार, विद्यार्थीनी सोशल मीडियावर खूप सक्रीय होती. विद्यार्थीनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पाकिस्तानच्या तरुणाच्या संपर्कात आली होती. तरुणाने तिला हनी ट्रॅपमध्ये फसवलं. तिला विश्वासात घेतलं आणि  लग्न करण्याचा वचन दिलं. 

त्यानंतर पंजाबच्या तरुणीने तिच्या यूपीआय अकाऊंटमधून तरुणाला पैसे पाठवले आणि ऑनलाईन ट्रेन तिकिट बुक केलं. त्याला गया येथील मार्गाने महाबोधी एक्स्प्रेसने दिल्ली येथे बोलावण्यात आलं. तिथून त्याला पंजाबला जायचं होतं. प्लॅननुसार, तो तरुण बॉर्डर पार करून विद्यार्थीनीला पाकिस्तानमध्ये दाखल करणार होता.

तरुणी बुरका घालून घरातून निघाली अन्..

विद्यार्थीनीला 3 सप्टेंबरला घरातून निघाली. परंतु, त्याच दिवशी रात्री घरी परतली होती. तिचा मोबाईल त्या दिवशी घरीच राहिला होता. घरातून पळून जाणार नाही, असा विश्वास तिने कुटुंबियांना दिला होता. त्यानंतर तिने घरच्या लोकांकडून मोबाईल घेतला. त्यानंतर ती पुन्हा 5 सप्टेंबरच्या सकाळी घरातून बुरका घालून पळाली आणि महाबोधी एक्स्प्रेसने दिल्लीला गेली.

हे ही वाचा >> फ्लाइटमध्ये शेजारी बसली सुंदर महिला जुळलं सूत, पण फ्लाइट लँड झालं आणि 'त्या' गोष्टीमुळे...

त्यानंतर विद्यार्थ्यीनीचे वडील पोलीस स्टेशनला गेले आणि मुलगी पळून गेल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पकरीबरावां पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढलं आणि आरसीएफकडून मदत मागितली. आरसीएफने महिला पोलिसांच्या मदतीने बुरका घातलेल्या विद्यार्थीनीला शोधलं. त्यावेळी ती पाकिस्तानी तरुणासोबत फोनवर बोलत होती. पोलिसांचं नाव समोर येताच तरुणाने फोन कट केला आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर विद्यार्थीनीला ब्लॉक केलं. आरपीएफने विद्यार्थीनीला चाईल्ड लाईनकडे सोपवलं आहे. 

हे ही वाचा >> मुलींच्या वसतिगृहात सुरू होता घाणेरडा खेळ, परराज्यातून महिलांचं सुरू होतं सेक्स रॅकेट, एका झटक्यातच...

हे वाचलं का?

    follow whatsapp