फ्लाइटमध्ये शेजारी बसली सुंदर महिला जुळलं सूत, पण फ्लाइट लँड झालं आणि 'त्या' गोष्टीमुळे...
लंडनहून लॉस एंजेलिसला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एक तरुणाची भेट सुंदर महिलेसोबत झाली. दोघांनी ती रात्र एकत्र घालवण्याचा म्हणजेच वन नाइट स्टँडचा प्लॅन बनवला. पण जेव्हा ते विमानातून उतरले तेव्हा त्या माणसाला मोठा धक्का बसला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फ्लाइटमध्ये सुंदर महिलेसोबत जुळले सूत
पण फ्लाइट लँड झालं आणि 'त्या' अंगठीमुळे घडली धक्कादायक गोष्ट...
Viral Story: लंडनहून लॉस एंजेलिसला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एक तरुणाची भेट सुंदर महिलेसोबत झाली. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं आणि दोघांनी ती रात्र एकत्र घालवण्याचा म्हणजेच वन नाइट स्टँडचा प्लॅन बनवला. पण जेव्हा ते विमानातून उतरले तेव्हा त्या माणसाला मोठा धक्का बसला.
एक सुंदर महिला शेजारी येऊन बसली
एका 31 वर्षीय व्यक्तीने रेडिटवर सांगितलं की तो एका बिझनेस ट्रिपसाठी फ्लाइटने जात होता. तो अशा एअरलाइनने प्रवास करत होता जिथे प्रवासी आगाऊ सीट बुक करू शकत नाही. फ्लाइटमध्ये गेल्यानंतर तो त्याच्या सीटवर बसला आणि एक सुंदर महिला त्याच्या शेजारी येऊन बसली. ती महिला त्या तरुणासोबत फ्लर्ट करू लागली आणि या सगळ्या प्रकारामुळे तो तरुण आश्चर्यचकित झाला. मात्र, विमान लँड झाल्यानंतर एका अंगठीमुळे सगळं रहस्य उघडकीस आलं.
संध्याकाळी भेटण्याचा प्लॅन बनवला
रेडिटवर, संबंधित तरुणाने सांगितलं की ती महिला त्याच्याशी अतिशय फ्लर्टी होती. म्हणून तो तरुण तिच्याशी बोलू लागला. त्यावेळी महिलेनं सांगितले की ती तिच्या काही मैत्रिणींना भेटण्यासाठी लॉस एंजेलिसला जात आहे. दोघांमध्ये बोलणं सुरू असताना महिलेनं दोन्ही सीट्समधील आर्मरेस्ट काढून टाकलं. ती महिला सिंगल असल्याचं त्या तरुणाला वाटलं, म्हणून त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. त्या तरुणाने लगेच त्या महिलेला सांगितलं की तो कोणत्या हॉटेलमध्ये राहत आहे. त्या महिलेने हसून सांगितलं की ती देखील त्याच हॉटेलमध्ये राहणार आहे. अशात, त्या तरुणाने म्हटलं की "मग आपण ड्रिंकसाठी भेटूया." यानंतर, दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर एक्सचेंज केले. त्यांनी त्या संध्याकाळी भेटण्याचा प्लॅनही बनवला. त्या माणसाला वाटलं की आता काहीतरी खूप खास घडणार आहे.
हे ही वाचा: "उडी मार..." पतीने केलं प्रवृत्त अन् पत्नीने घराच्या छतावरून मारली उडी! जखमी झाल्यावर सुद्धा...
फ्लाइट लँड झालं अन् मोठा धक्काच बसला
विमान लँड झाल्यानंतर त्या महिलेनं पटकन तिचा सीटबेल्ट काढला. फ्लाइमधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी ती एक होती. त्या तरुणाला ते थोडं विचित्र वाटले, पण त्याने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. यानंतर, जेव्हा तो पुन्हा लगेज क्लेमवर त्या महिलेला भेटला तेव्हा त्याला धक्काच बसला. ती महिला दुसऱ्याच पुरुषाच्या मिठीत होता आणि तिच्या बोटात लग्नाची अंगठी होती. त्या तरुणाने महिलेला मॅसेज करून त्या पुरुषाबद्दल विचारला असता तिने त्याचं उत्तर देण्यास टाळलं. जेव्हा तो संध्याकाळी हॉटेलच्या बारमध्ये गेला तेव्हा ती महिला आणि तिचा नवरा तिथे होते. त्या पुरूषाने पाहिले की ती महिला लांबूनच त्याच्याशी सतत "फ्लर्टी आय कॉन्टॅक्ट" ठेवत होती.










