बीड हादरलं! आठवडाभरात दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत...

Beed Crime : बीडच्या परळीत मन हेलावून टाकणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गेल्याच आठवड्यात परळीत एका लहान मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर याच घटनेची पुनरावृत्ती बीडमध्ये होताना दिसतेय.

Beed crime

Beed crime

मुंबई तक

09 Sep 2025 (अपडेटेड: 09 Sep 2025, 05:41 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीडच्या परळीत मन हेलावून टाकणारं धक्कादायक प्रकरण

point

आठवढाभरातच दोन बलात्काराच्या घटना

Beed Crime : बीडच्या परळीत मन हेलावून टाकणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गेल्याच आठवड्यात परळीत एका लहान मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर याच घटनेची पुनरावृत्ती बीडमध्ये होताना दिसतेय. या प्रकरणी आता छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरणात आरोपी मेहफुज कुरेशी आणि रेहान सय्यदसह इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बीडच्या बरकतनगरमध्ये घडली होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Mumbai Crime : नौदलाचा गणवेश परिधान करून तरुण आला, नंतर जिवंत 40 काडतुसे आणि इन्सास रायफल चोरल्या 

नेमकं काय घडलं? 

गेल्या काही दिवसांपूर्वी बीडच्या परळी रेल्वे स्थानकात सहा वर्षीय चिमुरडीवर अमानुषपणे अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर अशाच एका घटनेची पुनरावृत्ती आता समोर आली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीला त्यांच्याच गल्लीतील राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला उचलून नेलं आणि नंतर तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला. या घटनेनं परळीत हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेनं संताप

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेनं बीडमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बरकतनगर भागातील अल्पवयीन मुलगी दुकानावर गेली असताना, तिला रस्त्यातच उचललं. त्यानंतर एका निर्जनस्थळी नेऊन चार नराधमांपैकी दोघांनी तिला पकडले आणि इतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. संबंधित प्रकरणात आरोपीने कलम 64(1),65(1),70(2),3(5) BNS सह कलम 4,6,8,12 पोक्सो ॲक्ट (POCSO Act) 2012, अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : Mumbai Crime : विवाहानंतर नवरा पत्नीला लॉजवर न्यायचा, नंतर तिला जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा अन् सोनं नाणं सर्वच...

आठवढाभरापूर्वी चिमुरडीवर अत्याचार 

गेल्या काही दिवसांपूर्वी बीडच्या परळीत एका चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला होता. या घटनेची संपूर्ण राज्यभरात चर्चा असतानाच असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. या हैवानी कृत्याचे प्रकरण पुढे आल्यान मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संभाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत. 

    follow whatsapp