Mumbai Crime : विवाहानंतर नवरा पत्नीला लॉजवर न्यायचा, नंतर तिला जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा अन् सोनं नाणं सर्वच...

mumbai crime : मुंबईतील मालाडमध्ये धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेनं आपल्याच पतीवर मानसिक, शारीरीक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Crime
Mumbai Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील मालाडमध्ये धक्कादायक प्रकरण

point

बायकोवर मानसिक, शारीरीक आणि आर्थिक शोषण

point

सर्व दागिने नेले, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime : मुंबईतील मालाडमध्ये धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेनं आपल्याच पतीवर मानसिक, शारीरीक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पीडित पत्नीने आरोप केला की तिच्या पतीनं अनेकदा तिच्यावर गर्भपात केला होता आणि तिचे दागिने देखील पळवून नेले. संबंधित पुरूष हा एका भोजपुरी चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक धीरज ठाकूर असल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी धीरज ठाकूरच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हे ही वाचा : 12 वर्षानंतर गुरु आणि मंगळ ग्रहाची युती, 13 सप्टेंबरपासून काही राशींतील लोकांच्या भाग्याचे उघडणार दरवाजे, काय सांगतं राशीभविष्य?

पीडित महिलेकडून गंभीर आरोप 

आरोप केलेल्या महिलेनं सांगितलं की, तिचा विवाह हा 25 एप्रिल 2022 रोजी धीरज देवेंद्र ठाकूरसोबत झाला होता. त्यांच्या लग्नात महिलेच्या आई वडिलांनी तीन लाख रुपयांचे दागिने आणि घरगुती संसार उपयोगी वस्तू दिल्या होत्या. लग्नानंतर दोघेही गोरेगांव आणि नंतर नालासोपारात वेगवेगळ्या ठिकाणी भाडेतत्वावर राहू लागले. पण तिचा आरोप आहे की, तिचा पती धीरजने तिला कायमचे घर दिले नाही आणि तो अनेकदा तिला हॉटेल्स आणि लॉजमध्ये घेऊन जायचा. तेव्हात अनेकदा त्यानं पीडितीवर जबरदस्ती करत गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास भाग पाडले.

हागड्या वस्तूंसह दागिने नेल्याचा महिलेचा आरोप

त्यानंतर तिने माझ्याकडून महागड्या वस्तूंसह दागिने नेल्याचा आरोप केला होता. तसेच अनेकदा मारहाण करत शिवीगाळही करण्यात आली होती. यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ लागला. जुलैमध्ये तिला तिच्या नवऱ्याने दारूच्या नशेतच बेदम मारहाण केली होती. त्यानंतर पत्नीने गोरेगांव पोलिसांकडे नवऱ्याच्या छळाविरोधात एनसी दाखल केली. त्यानंतर पीडित महिला आपल्या बहिणीच्या कुरार परिसरातील राहण्यास आली होती. त्यानंतर बहिणीच्या मदतीने महिलेनं कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा : Personal Finance: भरपूर फिरायची आवड असणाऱ्यांसाठी 'हे' 5 Credit Card,होईल बंपर सेव्हिंग!

अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या 

संबंधित प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी निरीक्षक संजीव तावडे यांच्या मदतीने कारवाई करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर छळाच्या आरोपांखाली आरोपी धीरज ठाकूरला पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp