Jammu Kashmir Terrorist Viral Video : जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरा येथील त्रालमध्ये आज गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्रालमध्ये अजूनही गोळीबार सुरुच आहे. सुरक्षा रक्षकांकडून लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. अशातच एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या आमिर वानी या दहशतवाद्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
ADVERTISEMENT
या व्हिडीओत तो त्याच्या कुटुंबियांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. दहशतवादी आमिर वानीला त्याची आई खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. त्या सरेंडर होण्यासाठी सांगते. परंतु, दहशतवादी आमिर त्याच्या आईचं म्हणणं ऐकत नाही आणि सैनिकांवर गोळीबार सुरुच ठेवतो. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत दहशतवादी आमिरचा खात्मा होतो.
'बेटा सरेंडर कर दे', आईने खूप समजावलं..
व्हिडीओ कॉलवर बोलताना आमिरची आई त्याला सांगते, बेटा सरेंडर कर. त्यानंतर आमिर आईच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत म्हणतो, सैनिकांना पुढे येऊ दे, मग बघतोच. आमिरचा एन्काऊंटर होण्याआधीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. तिथूनच तो आईसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता. व्हिडीओ कॉलवर बोलत असताना त्याच्याकडे AK-47 रायफल असल्याचंही समोर आलं.
सैनिकांनी सांगितलं सरेंडर कर, पण गोळी झाडली
आमिरसोबत आमिरची आई, बहीण आणि एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या आसिफच्या बहिणीनेही बोलणं केलं होतं. आसिफच्या बहिणीने विचारलं होतं, माझा भाऊ कुठे आहे..आसिफ तोच दहशतवादी आहे, ज्याचं घर IED ने उडवलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सरेंडर करावं, असं सुरक्षा रक्षकांचं म्हणणं होतं. परंतु, सरेंडर करण्याऐवजी त्याने सैनिकांवर गोळी चालवली.
ADVERTISEMENT
