पहलगाम हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रा म्हणाली, 'हल्ल्याला सर्वस्वी सरकार...' व्हिडिओ होतोय व्हायरल

Jyoti Malhotra Video Viral : पहलगाम हल्ल्यानंतर हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा काय म्हणाली? वृत्त वाचण्यासाठी वाचा सविस्तर.

Jyoti Malhotra Malhotra Statement On Pehelgam Attack

Jyoti Malhotra Malhotra Statement On Pehelgam Attack

मुंबई तक

20 May 2025 (अपडेटेड: 20 May 2025, 02:59 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पहलगाम हल्ल्यानंतर हेगरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा काय म्हणाली?

point

पहलगाम हल्ला होण्यामागे सरकार जबाबदार असल्याचं ती म्हणाली आहे.

point

तिच्या काही वक्तव्याने आणि भूमिकेने तिच्यावरील संशय आणखी बळावला गेला आहे.

Jyoti Malhotra Viral Video : पहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचे काही व्हिडिओज् आणि काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच तिचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबतचे फोटोही व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानातील एका पार्टीमध्ये ती गेली असतानाचे काही फोटो समोर आले होते. यामुळे तिच्यावर हेरगिरी केल्याचा संशय अधिक बळावला गेला आहे. अशातच तिने पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांचीच चूक असल्याचं सांगितलं आहे. तिने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

हेही वाचा : ज्योती मल्होत्राच्या तीर्थयात्रेमुळं भारताची सुरक्षा व्यवस्था आली धोक्यात? बैसाखी यात्रेत काय घडलं? वाचा Inside Story

हे वाचलं का?

अशातच पहलगाम हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्राने वक्तव करत गरळ ओकली आहे. ज्यात तिने सर्व काही पर्यटकांचा दोष असल्याचं सांगितलं आहे. तिने केलेलं वक्तव्य हे देशद्रोही मानलं जात आहे. जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा असतानाही हे कसं घडलं? असा प्रश्न तिने उपस्थित केला. तसेच तिने यात आपलीही चूक आहे असं म्हणत तिने देशविरोधात वक्तव्य केलं.

त्यानंतर तिने पहलगाम हल्ल्यावरुन सरकारला जबाबदार धरलं आहे. ती म्हणते की, जर कोणी दहशतवाद्यांना पाठिंबा देत असेल तर ती भूमिका चुकीची आहे. सध्याची सुरक्षा यंत्रणा ढासळू लागली आहे. या हल्ल्यात काहीतरी काळंबेरं आहे. या घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचं तिनं म्हटलं आहे.

हेही वाचा : Mumbai COVID-19 Death: मुंबईत पुन्हा कोरोना आला.. दोघांचा मृत्यू? खरं काय ते समजून घ्या!

ज्योती मल्होत्रा ही एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. ती हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहे. ज्योती आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पर्यटनासंबंधित व्लॉग बनवत असते. दरम्यान, तिच्यावर हेरगिरीचा आरोप करण्यात आला आहे. तिला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिची चौकशी केली जात आहे. यामध्ये इतर सहा जणांचाही समावेश आहे.

अशातच तिची आणखी एका युट्यूबर मैत्रिणीचे नावंही या प्रकरणात जोडण्यात आलं आहे. प्रियांका सेनापती असं त्या मुलीचं नाव आहे. पोलिसांनी तिच्याही घराची झडती घेतली आहे. 

    follow whatsapp