कोल्हापूर : विद्युत तारेत पतंग अडकला, दोन सख्खे भाऊ लोखडी रॉडने डवचू लागले अन् शेवटी व्हायचं तेच झालं

Kolhapur news : कोल्हापूर : विद्युत तारेत पतंग अडकला, दोन सख्खे भाऊ लोखडी रॉडने डवचू लागले अन् व्हायचं तेच झालं

Kolhapur news

Kolhapur news

मुंबई तक

06 Nov 2025 (अपडेटेड: 06 Nov 2025, 09:27 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : विद्युत तारेत पतंग अडकला

point

दोन सख्खे भाऊ लोखडी रॉडने डवचू लागले अन् व्हायचं तेच झालं

Kolhapur News : उचगाव परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पतंग खेळण्याचा निखळ आनंद एका कुटुंबावर काळ बनून कोसळला. विद्युत तारेत अडकलेला पतंग काढताना दोन सख्ख्या भावांना विजेचा जबर धक्का बसला. यात मोठा भाऊ सार्थक नीलेश वळकुंजे (वय 16) याचा मृत्यू झाला, तर धाकटा भाऊ कार्तिक (वय 14) गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?

दोन सख्खे भाऊ लोखडी रॉडने डवचू लागले अन् व्हायचं तेच झालं 

ही घटना उचगाव येथील मंगेश्वर मंदिराच्या मागे बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पतंग उडवताना एक पतंग उच्चदाब विद्युत तारेत अडकला. हा पतंग काढण्यासाठी सार्थक आणि कार्तिक या दोघांनी जवळील बंगल्याच्या गच्चीवर जाऊन प्रयत्न सुरू केला. हातात दहा एमएमची लोखंडी सळी घेऊन त्यांनी पतंग खाली आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सळीचा टोक उच्चदाबाच्या विद्युत तारेला लागताच विजेचा प्रचंड झटका बसला.

धक्क्याने सार्थक याला जागीच झटका बसून तो बेशुद्ध झाला, तर धाकटा भाऊ कार्तिक खाली फेकला गेला आणि गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोघांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी सार्थक याला मृत घोषित केले. कार्तिकची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद गांधीनगर पोलिस ठाण्यात झाली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विजेच्या तारेतून वाहणारा उच्चदाब किती घातक ठरू शकतो, याची ही घटना जिवंत उदाहरण ठरली आहे.

मृत सार्थक हा उचगाव येथील न्यू माध्यमिक हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील मेंढपाळ असून आई गृहिणी आहे. मात्र, पतंग उडवताना झालेल्या या अपघाताने वळकुंजे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

या घटनेने उचगाव गावात शोककळा पसरली असून, शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. परिसरात सर्वत्र “थोडीशी बेफिकिरी, आणि एक निरागस जीव गेला...” अशा शब्दांत लोक दुःख व्यक्त करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, विद्युत तारेजवळ पतंग उडवणे किंवा वस्तू काढण्याचा प्रयत्न करणे जीवघेणे ठरू शकते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महिला डॉक्टरच्या हत्याकांडातील आरोपीबाबत धक्कादायक खुलासे, पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने महिलांना पाठवले 'ते' पाच संदेश

    follow whatsapp