गणेशभक्तांनो! लालबागच्या राजाचं मुखदर्शन सोहळा संपन्न..सोनेरी मखरमध्ये विराजमान झाले बाप्पा, पाहा जबरदस्त Video

Lalbaugcha Raja 2025 Mukhdarshan Video :  संपूर्ण जगभरातून गणेशभक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मुंबईत दाखल होतात. यंदाही लालबागचा राजा 27 ऑगस्ट 2025 रोजी विराजमान होणार आहे.

Lalbaugcha Raja Mukhdarshan 2025 Live

Lalbaugcha Raja Mukhdarshan 2025 Live

मुंबई तक

24 Aug 2025 (अपडेटेड: 24 Aug 2025, 08:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लालबागच्या राजाचं मुखदर्शन सोहळा संपन्न

point

सोनेरी मखरमध्ये लालबागचा राजा विराजमान

point

लालबागच्या राजाचं मुखदर्शनाचा सुंदर व्हिडीओ पाहिलात का?

Lalbaugcha Raja 2025 Mukhdarshan Video :  संपूर्ण जगभरातून गणेशभक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मुंबईत दाखल होतात. यंदाही लालबागचा राजा 27 ऑगस्ट 2025 रोजी विराजमान होणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 पर्यंत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. तत्पूर्वी लालबागच्या राजाचं मुखदर्शन सोहळा नुतकाच संपन्न झाला.

हे वाचलं का?

लालबागचा राजाची यंदाही भक्तीभावाने सजावट केली असून गणेशभक्त गणपती बाप्पाच्या दर्शनाची आतूरतेनं वाट पाहत आहे. लालबागच्या राजाला सोनेरी महलासारख्या आकर्षक मखरमध्ये विराजमान केलं आहे. गणपती बाप्पाला सोनेरी मुकूट अर्पण करण्यात आल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आज रविवारी 24 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी ७ वाजता लालबागच्या राजाचं मुखदर्शन सुरु झालं आहे. 

हे ही वाचा >> मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता लोकल ट्रेन अधिक वेगानं धावणार... पश्चिम रेल्वेकडून मोठी अपडेट

नवसाला पावणारा गणपती लालबागचा राजाचं मुखदर्शन नुकतच सुरु झालं आहे. जगभरातून भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत पोहोचतात. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मंडळ परिसरात भाविकांच्या मोठ्या रांगाच्या रांगाच लागलेल्या असतात. लालबागचा राजा परिसर आकर्षक रोषणाईने सजलेला असतो. यंदाही लालबागच्या राजाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 

    follow whatsapp