Laxmi Pujan 2025: यावर्षी लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं? 20 की 21 ऑक्टोबर... योग्य मुहूर्त जाणून घ्या

अश्विन अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. मात्र, यावर्षी अमावस्या दोव दिवस आल्याने लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं? याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

यावर्षी लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं?

यावर्षी लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं?

मुंबई तक

• 10:18 AM • 20 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

यावर्षी लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं?

point

20 की 21 ऑक्टोबर... योग्य मुहूर्त जाणून घ्या

Laxmi Pujan 2025: दिवाळी सणाच्या पाच दिवसांपैकी लक्ष्मीपूजन अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. दरवर्षी अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जातं. खरंतर, या दिवशी बलीच्या बंदिवासातून देवी लक्ष्मीची सुटका झाली होती, असं एका आख्यायिकेनुसार म्हटलं जातं. याच आनंदात दिवाळीच्या अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जातं. तसेच, 14 वर्षांच्या वनवासातून राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी दिव्यांची आरास करण्यात आली होती. तो दिवस आश्विन अमावस्येचा होता. त्यामुळे या अश्विन अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. मात्र, यावर्षी अमावस्या दोव दिवस आल्याने लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं? याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

हे वाचलं का?

अमावस्या नेमकी कधी?  

पंचांगानुसार, यावर्षी आश्विन अमावस्या सोमवारी 20 ऑक्टोबरला दुपारी 03:45 वाजता सुरू होणार आहे आणि 21 ऑक्टोबरला संध्याकाळी 05:50 वाजता समाप्त होणार आहे. मग, नेमक्या कोणत्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचं? याबाबत सविस्तर जाणून घ्या.

काय आहे पुजेचा शुभ मुहूर्त?  

लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळात (सूर्यास्तानंतर) केलं जातं. हा कालावधी जवळपास दोन तासांचा असतो. या काळात अमावस्या असते आणि याच कालावधीत लक्ष्मीपूजन करणं अत्यंत शुभ मानलं जातं. खरंतर, धार्मिक ग्रंथानुसार सूर्य उगवल्यानंतर जी तिथी पाहतो, त्या तिथीला महत्त्व दिलं गेलं आहे. अश्विन अमावस्या ही दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखली गेली आहे. 20 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास अमावस्येला प्रारंभ होत असल्यामुळे सूर्य ती तिथी पाहत नाही, याउलट 21 ऑक्टोबरची अमावस्या सूर्योदयानंतर असल्याने सूर्य ती तिथी पाहतो. त्यामुळे, 21 ऑक्टोबरच्या अमावस्या तिथीला लक्ष्मीपूजन करणं उचित आहे. मंगळवारी म्हणजेच  ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात म्हणजेच सायंकाळी 6:10 रात्री 8:40 या 2 तास 20 मिनिटांच्या कालावधीत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असल्याची माहिती आहे.

लक्ष्मीपूजन कसं करावं?  

लक्ष्मूपूजन हे घरातील उत्तर किंवा उत्तर-दिशेला करणं शुभ असल्याचं म्हटलं जातं. घरातील या दिशेत चौरंग ठेवावा आणि त्यावर एका लाल अंथरून घ्यावा. चौरंगाच्या उजव्या बाजूस तांदूळ ठेवून त्यावर कलश ठेवावा. त्या कलशात नाणं, विड्याची पाने आणि तांदळाचे दाणे टाकून त्यावर नारळ ठेवावा. त्यानंतर, चौरंगाच्या मध्यभागी देवी लक्ष्मी, गणपती आणि कुबेर यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. यापैकी काहीच नसल्यास तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता. नंतर, चौरंगावर पैसे किंवा नाणी ठेवावी आणि चौरंगाची फुले आणि हळद कुंकू लावून पूजा करून घ्यावी. यावेळी, झाडूची देखील पूजा केली जाते. आता, फराळ आणि गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

    follow whatsapp