स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी खुशखबर! MPSC कडून 552 जागांसाठी भरती जाहीर, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

एकूण 552 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यामध्ये प्रामुख्याने सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांसारख्या पदांचा समावेश आहे.

MPSC Recruitment 2026

MPSC Recruitment 2026

मुंबई तक

11 Apr 2026 (अपडेटेड: 11 Apr 2026, 09:43 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी खुशखबर!

point

एमपीएससीतर्फे 552 जागांसाठी भरती

point

ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

MPSC Recruitment 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-ब संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार एकूण 552 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यामध्ये प्रामुख्याने सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांसारख्या पदांचा समावेश असून प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.

हे वाचलं का?

'इतक्या' पदांसाठी भरती

या भरतीमध्ये पदांच्या तपशिलानुसार सहायक कक्ष अधिकाऱ्यांच्या 6 जागा, राज्य कर निरीक्षकांच्या 236 जागा आणि पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सर्वाधिक म्हणजे 310 जागा भरल्या जाणार आहेत. शैक्षणिक पात्रतेचा विचार करता, सर्व पदांसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे. मात्र, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक निकष देखील महत्त्वाचे असून, पुरुष उमेदवारांची उंची किमान 165 सेमी व महिलांची 157 सेमी असणे अनिवार्य आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather: कोकणात सूर्यनारायण तापणार, उष्ण आणि दमट हवामानमुळे होणार लाही-लाही

वयोमर्यादा

वयोमर्यादेबाबत बोलायचे झाले तर, 1 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय मोजले जाईल. सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक पदासाठी 18 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात, तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 19 ते 31 वर्षे ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नियमानुसार मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अनाथ उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांपर्यंतची सवलत देण्यात आली आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल.

हे ही वाचा : शुक्र आणि शनीचा दशांश योग, या राशींसाठी पुढील 48 तास ठरणार खूपच खास, नेमकं काय आहे तुमच्या राशीत?

अर्ज करण्याची शेवटची तारीख

इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. या परीक्षेचा अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 354 रु. तर इतर प्रवर्गांसाठी 254 रुपये इतकी फी आकारली जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 30 एप्रिल 2026 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शेवटच्या क्षणी होणारी तांत्रिक अडचण टाळण्यासाठी उमेदवारांनी मुदतीपूर्वीच आपले अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.