मुंबईची खबर : आता महापालिकेच्या रुग्णालयातही मिळणार आयव्हीएफ उपचार, लवकरच अंतिम निर्णय

मुंबई तक

• 09:29 AM • 31 Mar 2026

मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञान अल्प दरात सर्व सामान्य नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेने ठराव केला आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

BMC IVF News

BMC IVF News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : आता महापालिकेच्या रुग्णालयातही मिळणार आयव्हीएफ उपचार

point

लवकरच अंतिम निर्णय

BMC IVF News : वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवणारे तंत्रज्ञान म्हणजे आयव्हीएफ. असंख्य जोडप्यांसाठी हे तंत्रज्ञान आशेचा किरण ठरले आहे. मात्र यामध्ये येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे पैशांचा. हे तंत्रज्ञान वापरुन अपत्यप्राप्ती करण्यासाठी खूप खर्च येतो. या उपचारांच्या एका सायकलसाठी जवळपास दीड ते अडीच लाख रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अनेकांना पैशाअभावी हे उपचार घेता येत नाहीत. हीच गोष्ट ध्यानात घेऊन मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हे तंत्रज्ञान अल्प दरात सर्व सामान्य नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेने ठराव केला आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

भाजपकडून महापालिकेत ठराव

मुंबईतील धावपळीच्या आणि  ताण-तणावाच्या जीवनशैलीमुळे अनेक जोडप्यांना अपत्य प्राप्ती होण्यात अडचणी येतात. यासाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाची फार मदत होते. मात्र हे महागडे तंत्रज्ञान वापरुन उपचार करणे सर्वांना परवडेल असे नाही. त्यामुळे सर्वसामान्य जोडप्यांना हे उपचार अल्प दरात उपलब्ध व्हावेत यासाठी भाजपकडून महापालिकेत ठराव मांडण्यात आला होता. या ठरावाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. यानंतर हा ठराव अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे.  यानंतर या ठरावाविषयी अभ्यास करुन आणि हे उपचार अल्प दरात उपलब्ध करुन देता येतील का याविषयी अभ्यास करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : पुण्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, गारांमुळे 'या' भागाला शिमल्याचं स्वरुप, Video व्हायरल

काय आहे आयव्हीएफ तंत्रज्ञान?

आयव्हीएफ म्हणजे In-Vitro Fertilization.  अर्थात प्रयोगशाळेत स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचा संयोग घडवून गर्भ तयार करण्याचे प्रगत वंध्यत्व निवारण तंत्रज्ञान आहे. यामध्ये फलित गर्भ नंतर स्त्रीच्या गर्भाशयात स्थापित केला जातो. नैसर्गिकरित्या गर्भधारणा न होणाऱ्या जोडप्यांसाठी हे तंत्रज्ञान एक वरदान ठरले आहे. 

हे ही  वाचा : Personal Finance: बँक तुमच्या नकळत तुमच्याच खात्यातून काढू शकते का पैसे?

केईएम रुग्णालयात 'मा आयव्हीएफ केंद्र'

केईएममध्ये आयव्हीएफ तंत्रज्ञान अल्प दरात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यासाठी मा आयव्हीएफ केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी अपत्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्याला देण्यात येणारे उपचार हे खासगी क्षेत्रातील उपचाराच्या तुलनेत 50 टक्के सवलतीत उपलब्ध करुन दिले जातात. या आयव्हीएफ केंद्राच्या माध्यमातून वर्षभरात 500 ते 600 रुग्णांना सेवा देणे शक्य होणार असल्याचे सांगितले जाते.