Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील हवामानाबाबत नवीन अंदाज जाहीर केला आहे. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव राज्यावर दिसून येत असून, 1 डिसेंबरला ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होईल. तर राज्यातील 10 जिल्ह्यांत थंडीची लाट निर्माण होणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भंडाऱ्यात भाजप महिला उमेदवाराकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, गळ्यात भाजपचा दुपट्टा अन् जिरेटोपवर...
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्वच ठिकाणी हवामान विभागाने कोरडं वातावरण राहिल असा अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये गारठा वाढणार असल्याची शक्यता आहे. याच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या एकूण जिल्ह्यांचा समावेश होतो. याच जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीत हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे.
हे ही वाचा : “मुलगा बीडचा आहे, लग्न करू नको..” तरुणाने तिला संपवलं, घराला लॉक लावून त्यानं ट्रेनखाली जीव दिला, घटनेनं पुणे हादरलं
विदर्भ विभाग :
30 नोव्हेंबर रोजी विदर्भातील भंडारात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर 1 डिसेंबर रोजी नागपूर शहरांत धुक्यासह ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











