Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज जारी केलेला आहे, तर कुठे विजांच्या कडकडाटासह मान्सूनचा अंदाज आहे. अशातच जाणून घेऊयात 18 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाची परिस्थिती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 8 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर अत्याचार, घटनास्थळी आई पोहोचली..
कोकण
कोकणातील पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह विजांचा कडकडाट राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. हिंगोली, परभणी आणि जालनामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : घरात 5 वर्षांच्या मुलासह वडिलांचा मृतदेह, पोलिसांना हत्येचा संशय कोणावर?
विदर्भ
विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांत हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविला नाही.
ADVERTISEMENT












