Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांना हुडहुडी, IMD कडून 24 तासांसाठी नवा अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात हिवाळ्याची चाहूल लागली असून, 15 डिसेंबर रोजी राज्यातील बहुतांश भागात हवामान मुख्यतः कोरडे आणि स्वच्छ राहण्याची शक्यता आहे.

maharashtra weather

maharashtra weather

मुंबई तक

• 05:00 AM • 15 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील बहुतांश भागात हवामान मुख्यतः कोरडे हवामान

point

जाणून घ्या राज्यात कुठे थंडावा?

हे वाचलं का?

Maharashtra Weather : राज्यात मोठ्या प्रमाणात थंडावा निर्माण झाला आहे. 15 डिसेंबर रोजी राज्यातील बहुतांश भागात हवामान मुख्यतः कोरडे आणि स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण विभागातील इतर भागांत किमान तापमान 10 ते 15 अंशाच्या आसपास असल्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान किमान 28 ते 33 अंशापर्यंत पोहोचले.

हे ही वाचा : पैसा-पाणी: SIP सुरू ठेवावी की बंद करावी? गुंतवणूकदार चिंतेत!

कोकण विभाग :

कोकण विभागात 15 डिसेंबर रोजी मुख्य स्वच्छ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईत किमान तापमान हे किमान 22 अंश सेल्सिअस कमाल 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे-पालघर या जिल्ह्यांमध्ये तापमान हे 20-33 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

मध्य महाराष्ट्र विभाग :

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात कोरडं राहण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी धुके कमी होईल, पण रात्रीच्या दरम्यान, थंडी कायम राहणार आहे.

मराठवाडा विभाग :

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणीत आकाश हे निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सकाळी थंडी आणि दिवसभर उबदार वातावरणाची शक्यता आहे.

हे ही वाचा : 'आत्यानं आणि पप्पांनी आईला मारलं', 4 वर्षाच्या चिमुरड्यानं सांगितला घटनेचा थरार, अखेर महिलेनं...

विदर्भ विभाग :

विदर्भ विभागात हवामान विभागाने अकोला, अमरावती, वर्धा येथे कोरडं आणि थंड हवामान कायम राहिल असा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही भागांमध्ये थंडीची लाट पसरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

    follow whatsapp