Maharashtra Weather: कोकणात विजांच्या गडगडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस, पाहा कसं आहे हवामान!

भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात 5 सप्टेंबर रोजी मान्सून सक्रिय राहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे, काय सांगतं एकूण राज्यातील हवामान?

maharashtra weather rain alert in konkan

maharashtra weather rain alert in konkan

मुंबई तक

• 06:00 AM • 05 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाचा अंदाज

point

5 सप्टेंबर रोजी मान्सून सक्रिय राहणार

point

काय सांगतं हवामान विभाग?

हे वाचलं का?

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात 5 सप्टेंबर रोजी मान्सून सक्रिय राहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. राज्याच्या विविध भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील किनारपट्टीवर 50 किमी तास वेगाने वारे वाहण्याची हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

हे ही वाचा : 'ये बाबा येना...' एकनाथ शिंदे आजतकशी साधत होते संवाद, नातवाची अचानक एंट्री, व्हिडिओ तुफान व्हायरल

कोकण भागात पावसाची स्थिती :

मुंबईसह कोकण भागात 5 सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरणाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तर अधूनमधून पावसाची शक्यता आहे. कोकणात कमाल तापमान 29.4° सेल्सिअस ते किमान तापमान 25° सेल्सिअस आहे. पावसाची शक्यता 97% इतकी असून, पश्चिम-दक्षिण-पश्चिम दिशेने 14.5 किमी/तास वेगाने वारे वाहतील. थोडक्यात दमट वातावरणाची शक्यता राहील. कोकण भागातही समान परिस्थिती अपेक्षित आहे, ज्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र :

मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि सातारा यांचा समावेश आहे, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. तर पुण्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती जाणवेल, तसेच दुपारी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. तसेच वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तरहवामान विभागाने विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हे ही वाचा : भिवंडी हादरली! नवऱ्यानं बायकोचा गळा चिरून खाडीत फेकलं मुंडकं, नंतर शरीराचे केले तुकडे, घटना ऐकून पोलिसंही चक्रावले

नागपूर आणि विदर्भात पावसाची स्थिती :

पूर्व महाराष्ट्र आणि विदर्भात, ज्यामध्ये नागपूरचा समावेश आहे. या भागात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाचा अंदाज आहे. तर कमाल तापमान 27.2° सेल्सिअस ते किमान 27.1° सेल्सिअस तापमानाची शक्यता आहे. पावसाची शक्यता 55% असून, दुपारी पश्चिम-दक्षिण-पश्चिम दिशेने वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाची स्थिती राहिल. 

    follow whatsapp