बापरे! मुलीच्या मागे लागला साप अन् महिन्याभरात तब्बल 9 वेळा डसला... नेमकी घटना काय?

उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये एका मुलीला महिन्याभरात 9 वेळा साप डसल्याची चकित करणारी बातमी समोर आली आहे. पीडितेला हा साप वारंवार डसत असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुलीच्या मागे लागला साप अन् महिन्याभरात तब्बल 9 वेळा डसला...

मुलीच्या मागे लागला साप अन् महिन्याभरात तब्बल 9 वेळा डसला...

मुंबई तक

• 10:59 AM • 03 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलीच्या मागे लागला साप

point

महिन्याभरात तब्बल 9 वेळा डसला साप

point

नेमकी घटना काय?

Shocking Viral Incident: बऱ्याचदा साप बदला घेण्यासाठी एक व्यक्तीच्या मागे लागत असल्याचं चित्रपट किंवा मालिकांमध्ये पाहायला मिळतं. पण प्रत्यक्षात या गोष्टी अंधश्रद्धा आहेत आणि साप हा देखील एक सामान्य प्राणी असून तो स्वतःचं रक्षण करण्यासाठी एखाद्याला चावतो, असं आपण मानतो. मात्र, उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये एका मुलीला महिन्याभरात 9 वेळा साप डसल्याची चकित करणारी बातमी समोर आली आहे. पीडितेला हा साप वारंवार डसत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

कौशांबीच्या सिराथू तहसील येथील भैसहापर गावात राहणारी रिया मौर्य नावाची मुलगी ही 9 वी इयत्तेत शिकत असल्याची माहिती आहे. रियाला एक साप 9 वेळा डसल्याचं सांगितलं जात आहे. मुलीच्या कुटुंबियांमध्ये सुद्धा भितीचं वातावरण निर्माण झालं असून सगळ्या गावकऱ्यांना या घटनेबद्दल मोठा धक्का बसला आहे. आरोग्य विभागाला संबंधित मुलीला साप चावल्याची माहिती मिळताच मुलीवर उपचार करण्यात आले. 

रियाच्या वडिलांनी काय सांगितलं? 

22 जुलै 2025 रोजी शेतात जात असताना रियाला पहिल्यांदा साप चावला असल्याचा दावा रियाच्या वडिलांनी केला. त्यानंतर, तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचारानंतर रिया यातून बरी झाली. परंतु, 13 ऑगस्ट रोजी रियाला पुन्हा एकदा साप डसला. यावेळी तिची प्रकृती गंभीर असल्याकारणाने डॉक्टरांनी तिला प्रियागराज येथे रेफर केलं. मात्र, तिच्या कुटुंबियांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करून तिच्यावर तिथे उपचार करण्यात आले. उपचारानंतर, रिया पुन्हा यातून बाहेर आली. 

हे ही वाचा: 30 वर्षांची महिला गेली अल्पवयीन मुलासोबत पळून! दोन मुलांना देखील सोडलं, नंतर लैंगिक संबंध अन्...

उपचारात जमा पूंजी देखील संपली 

रियाचे वडील राजेंद्र मौर्य यांनी सांगितलं की 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान, रियाला बऱ्याचदा साप चावला. कधी अंघोळ करताना तर कधी घरची कामे करताना तिला साप डसल्याचं सांगण्यात आलं. रियाच्या उपचारात त्यांची जमा पूंजी देखील संपली असल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं. आता नाईलाजाने ते भूतबाधाचा मार्ग अवलंबत असल्याचं त्यांनी म्हटलं. 

पीडितेने सांगितल्याप्रमाणे, साप खूपच मोठा असून  त्याचा रंग काळा आहे आणि त्याच्या शरीरावर हिरव्या रंगाचे पट्टे आहेत. हा साप चावल्यानंतर सुमारे 1 तासानंतर ती बेशुद्ध पडते. जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा ती कधी हॉस्पिटलच्या बेडवर असते तर कधी भूतबाधा करणाऱ्या मांत्रिकाजवळ असते.

हे ही वाचा: Maratha Reservation: मनोज जरांगेंना आझाद मैदानातच का आलं ढसाढसा रडू?

गावकऱ्यांचा आरोप

गावातील लोक सुद्धा या प्रकरणामुळे आता भीती आणि दहशतीत जगत आहेत. या घटनेबद्दल माहिती दिल्यानंतर सुद्धा, वन विभागाने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला नाही आणि प्रशासनाने देखील कुटुंबियांना मदत केली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. मात्र, ही बाब आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. कौशांबी सीएमओ यांनी लवकरच आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी पाठवली जाणार असल्याची माहिती दिली. 

    follow whatsapp