धावत्या ट्रॅव्हल्समध्ये अंगावर पेट्रोल ओतून घेतलं पेटवून, प्रवाशांनी पाहिलं अन्... भयंकर घटना

maharashtra news : एका व्यक्तीने धावत्या ट्रॅव्हेल्समध्येच आपल्या अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं आहे. त्यांचं नाव सुनील सज्जनराव टाले (वय 50) असे त्याचं नाव आहे.

maharashtra news

maharashtra news

मुंबई तक

01 Sep 2025 (अपडेटेड: 01 Sep 2025, 12:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

धावत्या ट्रॅव्हेल्समध्येच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं

point

जालना जिल्ह्यातील मन हेवावून टाकणारी घटना

point

प्रवाशांचा उडाला थरकाप

Maharashtra news : एका व्यक्तीने धावत्या ट्रॅव्हेल्समध्येच आपल्या अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं आहे. त्यांचं नाव सुनील सज्जनराव टाले (वय 50) असे त्याचं नाव आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील आरेगांव येथील स्थानिक होते. ही मन हेलावून टाकणारी घटना जालना जिल्ह्यातील बदनामपूर येथील असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मुंबईत मोर्चाला जायला पैेसे नाहीत मी घरीच...' नैराश्यात येऊन आणखी एका मराठा तरुणानं औषध पिऊन उचललं टोकाचं पाऊल

पुण्याहून पुसदकडे जात असताना धक्कादायक प्रकार 

संबंधित ट्रॅव्हल्स ही पुण्याहून पुसदकडे जात होती. तेव्हा बदनापूर येथून ट्रॅवल्स जात असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना घडल्यानंतर प्रवाशांनी पाहिलं असता, 12 नंबरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतलं होतं. तेव्हा चालकाने वाहन तात्काळपणे निरंकारी पेट्रोलपंप जवळ थांबवली.

संबंधित प्रकरणात व्यक्ती पूर्णपणे जळून खाक झाला होता आणि त्याचा मृत्यू झाल्याचं दिसत होतं. प्रवाशांनी तात्काळपणे बदनापूर पोलीस ठाण्यातील पोलिसांना या घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीकडे काही वस्तू होत्या त्या वस्तूच्याच अधारे व्यक्तीची ओळख समोर आली

हे ही वाचा : बीड हादरलं! परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर आई-वडील करत होते आराम, 5 वर्षांच्या मुलीला नेलं अज्ञातस्थळी अन्...

आत्महत्येचं कारण काय? 

सुनील टाले यांनी अशी टोकाची भूमिका का घेतली आहे, याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही. बदनापूर पोलीस संबंधित प्रकरणाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ही दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    follow whatsapp