ADVERTISEMENT
Maharashtra Weather : भारतीय हवामान खात्याच्या (IMD) च्या अंदाजानुसार, 3 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील विविध भागांमध्ये हवामानातील बदल अपेक्षित आहे. राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा : 'दुपारी 3 वाजेपर्यंत रस्ते रिकामे करा अन्यथा...' हायकोर्टाचा सरकारला आदेश, आता उरला अवघा अर्धा तास.. मुंबईत काय सुरू?
कोकण :
कोकण भागातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सकाळपासून ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरींसह मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात वादळी वाऱ्यांसंह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसेच पुण्यात 30-32 अंश सेल्सिअस तापमान राहिल असा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील जालना, लातूर आणि नांदेड या भागांमध्ये हलका ते मध्यम पावसाची हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे. छत्रपती संभाजीनगरात 33-35 अंश सेल्सिअस तापमान राहील, आणि सायंकाळी काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे.
हे ही वाचा : शरीरसंबंध ठेवण्यास बायकोचा नकार, नवऱ्यानं बायकोला पाहिलं परपुरुषासोबत, बायकोनंच...
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र :
नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती यांसारख्या भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. नागपूरमध्ये सरासरी 28-30 अंश सेल्सिअस तापमान राहील, आणि 1200-1300 मिमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि जळगावमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तापमान 32-34 अंश सेल्सिअस राहील, आणि आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवण्याची हवामान विभागाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
