Govt Job: सुप्रीम कोर्टात ‘या’ पदांसाठी निघाली भरती! काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

सुप्रीम कोर्टाकडून मास्टर (शॉर्टहँड) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टात ‘या’ पदांसाठी निघाली भरती!

सुप्रीम कोर्टात ‘या’ पदांसाठी निघाली भरती!

मुंबई तक

• 02:23 PM • 02 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुप्रीम कोर्टाकडून निघाली मोठी भरती...

point

काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Govt Job: कोर्टात सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सुप्रीम कोर्टाकडून मास्टर (शॉर्टहँड) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 30 ऑगस्ट रोजी सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना सुप्रीम कोर्टाच्या sci.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता  

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवीची डिग्री असणं अनिवार्य आहे. यासोबतच, उमेदवाराची शॉर्टहँड स्पीड प्रति मिनिट 120 शब्द आणि संगणक टायपिंगचा वेग प्रति मिनिट 40 शब्द असणं आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराला किमान 5 वर्षांचा अनुभव असणे देखील अनिवार्य आहे.

हे ही वाचा: मुलाला बर्थडे गिफ्ट देण्यावरून झालं भांडण! सासू वाद मिटवायला गेली अन् कात्रीनेच पत्नी आणि सासूला...

वयोमर्यादा   

तसेच, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 30 वर्षे आणि कमाल 45 वर्षे असणं गरजेचं आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल. याव्यतिरिक्त, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1500 रुपये शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 750 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

किती मिळेल वेतन?  

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर-11 अंतर्गत दरमहा 67,700 रुपये वेतन देण्यात येईल. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाच्या या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना इतर भत्ते आणि सुविधा देखील मिळतील.

हे ही वाचा: सात वर्षांपासून पती बेपत्ता! नंतर रील्समध्ये दुसऱ्याच महिलेसोबत दिसला अन्... पत्नीसमोर आलं धक्कादायक सत्य..

कुठे कराल अर्ज?  

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम sci.gov.in या सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या वेबसाइटवरील भरतीच्या सेक्शनमध्ये जाऊन Link to submit online application forms for the post of Court Master (Shorthand) या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अतिशय काळजीपूर्वक अर्ज भरून तो सबमिट करा.

    follow whatsapp