Maharashtra weather : राज्य तापून निघणार, उन्हाचा मोठा कहर होणार; 6 जिल्ह्यांच्या नाकी नऊ येणार

Maharashtra Weather : राज्यात सध्या उन्हाचा तडाखा अधिक जाणवण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. राज्यातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 12 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात सध्या उन्हाचा तडाखा

point

एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे...

Maharashtra Weather : राज्यात सध्या उन्हाचा तडाखा अधिक जाणवण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. राज्यातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दुपारच्या वेळी नागरिकांना उन्हापासून विशेष काळजी घ्यावी अंसा अंदाज वर्तवलेला आहे. अशातच 12 मे 2025 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : धाकट्या भावाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवल्याने थोरल्या भावाची विटेने हत्या, मृतदेह झुडपात दिला फेकून

कोकण 

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वातावरण उष्ण आणि दमट राहणार आहे. समुद्रकिनारी असलेल्या परिसरात वातावरणाची आर्द्रता अधिक राहील आणि उकाड्यात तीव्रता जाणवेल अशी शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा अधिक प्रभाव तीव्र राहील. तसेच दुपारच्या वेळी उष्ण वारे वाहणार असून  काळजी घ्यावी, असे आवाहन केले. 

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. या भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी वेळेतच बाहेर पडावे, असे आवाहन करणे गरजेचे आहे. 

मराठवाडा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. तसेच बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना मात्र कोणताही अलर्ट जारी केला नाही. 

हे ही वाचा : यवतमाळ : बायकोचा दुसऱ्याच पुरूषावर जडला जीव, नवऱ्याला संपवण्यासाठी दंडावर शॉक देऊन...

विदर्भ

विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. दुपारी उष्णतेच्या लाटा वाहण्याची हवामान विभागाने संभावना वर्तवली आहे. तसेच उष्णतेमुळे दुपारच्या वेळी उकाडा अधिक जाणवेल.