पुणे : नदीत सापडला 80 वर्षीय वृद्धेचा मृतदेह, 'या' गोष्टीसाठी झाली हत्या; पोलिसांनी कसं उकललं हत्येचं गूढ?

सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी 80 वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने खून केल्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरुन नदीत फेकून दिला.

Pune Crime

Pune Crime

मुंबई तक

• 11:18 AM • 10 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : नदीत सापडला 80 वर्षीय वृद्धेचा मृतदेह

point

पोलिसांनी कसं उकललं हत्येचं गूढ?

Pune Crime : पुण्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील करंजविहीरे येथे सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी 80 वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने खून केल्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून भामा नदीच्या पात्रात फेकून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

गळा दाबून हत्या

मौजे करंजविहीरे येथील मरगज वस्तीवर राहणाऱ्या सिंधुबाई विठोबा मरगज (वय 80) या 2 मे रोजी रात्रीच्या सुमारास वस्तीवरील पायटा रस्त्याने जात असताना आरोपी कैलास कुंडलिक मरगज (वय 36) याने त्यांना अडवले. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने आरोपीने गळा दाबून हत्या केली. यानंतर आरोपीने वृद्धेच्या अंगावरील दागिने काढून घेतले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून करंजविहीरे-धामणे मार्गावरील भामा नदीच्या पुलावरून नदीपात्रात फेकून दिला.

हे ही वाचा : 'विजय सरकार'चा शपथविधी, 29 वर्षीय किर्तनासह 9 आमदार होणार मंत्री; एक डॉक्टर तर 3 जण पोस्ट ग्रॅज्युएट

नातवाने दिली फिर्याद

या प्रकरणी मयत महिलेचा नातू समीर बाळू मरगज (वय 27) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपीला अटक केली. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 103(1), 309(6) आणि 238 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : 'माझ्या बायकोवर वाईट नजर...' सख्ख्या भावांमध्ये रंगला रक्तरंजित थरार; पुढे काय घडलं?

परिसरात संताप

या अमानुष घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडिक करत आहेत.